Join us

VIDEO : फोटोग्राफर रणबीर कपूरला म्हणाला - 'लग्नात भेटू', त्याचं उत्तर ऐकून हसू लागले लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 11:46 AM

Ranbir Kapoor : मुंबईत दिवंगत अभिनेते राजीव कपूरचा शेवटचा सिनेमा 'तुलसीदास जूनिअर' चं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. तेव्हाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा बॉलिवूडच्या सर्वात कूल अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या आणि आलिया भट्टच्या लग्नाची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. अशात त्याला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने दिलेल्या उत्तरावर सगळेच हसू लागले. मुंबईत दिवंगत अभिनेते राजीव कपूरचा शेवटचा सिनेमा 'तुलसीदास जूनिअर' चं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. तेव्हाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

व्हिडीओत एका फोटोग्राफरचा आवाज येतो आहे. तो रणवीरला म्हणाला, 'बाय आरके, लग्नात भेटू'. यावेळी रणवीर इव्हेंटमधून बाहेर जात होता. रणवीरने जेव्हा पापाराजीचं हे बोलणं ऐकलं तर म्हणाला की, 'कुणाच्या लग्नात?'. रणबीरच्या या रिअॅक्शनवर तिथे उपस्थित सगळे लोक हसू लागले होते. त्यावर फोटोग्राफर म्हणाला की, 'लव रंजन सरच्या लग्नात'.‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सारख्या सिनेमांचा दिग्दर्शक लव रंजन २० फेब्रुवारीला लॉंग टाइम गर्लफ्रेन्डसोबत लग्न करणार आहे. 

रणबीर कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यावर व्हायरल झाला. त्याचे फॅन्स त्याच्या हजरजबाबीपणाचं आणि समजदारीचं कौतुक करत आहेत. दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची फॅन्स आतुरतेने वाट बघत आहेत. दोघेही २०१८ पासून एकमेकांना डेट करत आहेत. 

आलिया नुकतीच एका मुलाखतीत म्हणाली की, 'मी रणबीरसोबत खूप आनंदी आहे आणि त्याच्यावर माझं खूप प्रेम आहे. माझा नात्यावर विश्वास आहे. मी खूप रोमॅंटिक आहे. मी प्यार किया तो डरना क्या टाइपची आहे'. 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटबॉलिवूड