बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात या प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत. यादरम्यान रिया चक्रवर्तीचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ जलेबी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. यात निर्माते महेश भट आणि अभिनेता वरुण मित्रा दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक रिया आणि महेश भट यांच्यावर खूप चिडले आहेत.
खरेतर व्हिडिओत पहायला मिळतंय की जेव्हा रिया चक्रवर्ती मीडियाशी बोलत आहे. त्यावेळी तिने महेश भट यांचा हात घट्ट पकडलेला दिसत आहे. इतकेच नाही तर रिया बोलते आहे आणि महेश भट तिच्या काही काळ खांद्यावर डोके ठेवतात आणि काढतात. पण या व्हिडिओत रिया पूर्णपणे कम्फर्टेबल दिसत आहे. पण हा व्हिडिओ लोकांनी पाहिल्यानंतर अनकम्फर्टेबल झाले आहेत आणि लोक त्यांच्यावर टीका करत आहेत.
सुशांतच्या निधनाला जवळपास एक महिना झाल्यानंतर सुशांतचे वडील केके सिंग यांनी रियाच्या विरोधात पटनामध्ये तक्रार दाखल केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर ब्लॅकमेलिंग,पैसे बळकावणे आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांसोबत पटना पोलीसदेखील सामील झाली.
काही दिवस पटना पोलीस आणि मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला पण आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे.