Join us

Video: श्रद्धा कपूरलाही पिझ्झाचा मोह आवरेना! थेट पापाराझींनाच विचारलं, 'एक्स्ट्रा है क्या?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 14:37 IST

श्रद्धा कपूरची गणना बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते.

बाॅलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. श्रद्धा कपूरची गणना बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिच्यातील हा साधेपणा सुद्धा चाहत्यांना मोहून टाकत असतो. अभिनेत्री अनेकदा त्यांच्या क्यूटनेसमुळे मीडियामध्ये लोकांचे लक्ष वेधून घेतात. आता नुकतेच पुन्हा एकदा श्रद्धाचा एक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चला तर मग जाणून घेऊयात नेमके घडले तरी काय…

श्रद्धा कपूर सोमवारी एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. यावेळी श्रद्धा गुलाबी रंगाचा गाऊन परिधान करून इव्हेंटमध्ये पोहोचली आणि ती खूपच सुंदर दिसत होती. इव्हेंटमध्ये पोहोचल्यानंतर श्रद्धा कपूरने कॅमेऱ्यासमोर हटके पोज दिल्या. यातच अचानक अभिनेत्रीची नजर एकत्र पिझ्झा पार्टी करत असलेल्या पापाराझींवर पडली. श्रद्धा कपूर ही पापाराझींच्या पिझ्झा पार्टीत श्रद्धा कपूरही सामील झाली होती. 

 पापाराझींनीही पिझ्झा बॉक्स उघडला आणि श्रद्धाला दिला. यावर 'एक नक्की घेईन' अस म्हणत श्रद्धाने पापाराझींकडून पिझ्झा घेतला.  श्रद्धा कपूर पापाराझींकडून पिझ्झा मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांना श्रद्धाची 'डाउन टू अर्थ' वागणूक खूप आवडली. सोशल मीडियावर चाहते तिचं खूप कौतुक करत आहेत. 

श्रद्धा ही नुकतीच 'तू झुठी मै मक्कार' या सिनेमात दिसली. यातील तिची आणि रणबीर कपूरची जोडी खूपच पसंत केली गेली. सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहे. शिवाय, राजकुमार रावसोबत 'स्त्री २' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'स्त्री २' ऑगस्ट २०२४ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूरसेलिब्रिटीबॉलिवूड