Join us

Video : ​‘या’ बॉलिवूड चित्रपटांना पाकिस्तानात आहे बंदी !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 10:14 AM

आपल्याकडच्या बऱ्याच चित्रपटांवर पाकिस्तानात या ना त्या कारणानं बंदी घातली जाते. जाणून घेऊया कोणकोणत्या बॉलिवूड चित्रपटांना बंदी घालण्यात आली आहे.

-रवींद्र मोरे नितीन कक्कर दिग्दर्शित ‘फिल्मीस्तान’ चित्रपटात पाकिस्तानी जनता कशी बॉलिवूडची दिवानी आहे हे दाखविण्यात आले आहे. तेथील जनतेचेही आपल्यासारखेच बॉलिवूड चित्रपटातील सगळे डायलॉग पाठ असतात, गाणी माहिती असतात, आणि तितकेच ते आपल्या हिरो-हिरॉईन्सचे फॅन्स पण असतात. नेमके याच मुद्यावरुन हिंदी सिनेमांच्या प्रदर्शनाला तिथल्या सेन्सॉर्ड बोर्डाने खोडा घालायला चालू केलाय. आपल्याकडच्या बऱ्याच चित्रपटांवर पाकिस्तानात या ना त्या कारणानं बंदी घातली जाते. जाणून घेऊया कोणकोणत्या बॉलिवूड चित्रपटांना बंदी घालण्यात आली आहे. * खिलाडी 786२०१२ मध्ये आलेला अक्षय कुमारचा 'खिलाडी 786' हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होऊ शकला नाही. अक्षय भलेही बॉलीवूडचा खिलाडी असला, तरी पाकिस्तानात त्याच्या या चित्रपटाला नाकारलं गेलं. ७८६ हा आकडा मुस्लिमांसाठी अतिशय पवित्र आहे आणि अशा विनोदी चित्रपटात या आकड्याचा वापर झाल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील, हे यामागचं कारण होतं.* एक था टायगरसलमान खानचा हा चित्रपट जगभरात ३१० कोटींची कमाई करूनही पाकिस्तानात मात्र प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटात कॅटरिनाने पाकिस्तानी आयएसआय एजंटची तर सलमानने भारतीय रॉ एजंटची भूमिका साकारली होती. या दोघांतली लव्हस्टोरी पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाला पचली नाही, म्हणून हा चित्रपट तिथे प्रदर्शित होऊ  शकला नाही. * रांझणादाक्षिणात्य सुपरस्टार धनुष्यचा पहिला हिंदी चित्रपट होता २०१३ मध्ये आलेला रांझणा. इथेही एक छानशी लव्हस्टोरी होतीच. पण हाही चित्रपट पाकिस्तानमध्ये बॅन केला गेला. कारण यात सोनम कपूरचं पात्र एका मुस्लिम मुलगीचं होतं. जी कुंदन (धनुष्य) या हिंदू मुलाच्या प्रेमात पडते.  * भाग मिल्खा भागमहान भारतीय धावपटू मिल्खा सिंह यांच्या जिवनावर बेतलेला राकेश मेहरांचा भाग मिल्खा भाग हा जीवनपट भारतीय प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरला. पण हा चित्रपटसुध्दा पाकिस्तानात प्रदर्शित होऊ शकला नाही. यात मिल्खा सिंह यांच्या पात्राने आपल्या कुटुंबीयांना उद्देशून एक डायलॉग म्हटलाय, ‘मुझसे नहीं होगा. मै पाकिस्तान नहीं जाऊंगा.’ हा डायलॉग आणि मिल्खा सिंह यांनी केलेला पाकिस्तानी धावपटूचा पराभव, या साऱ्याचा परिणाम म्हणून चित्रपटाला पाकिस्तानात बॅन करण्यात आले. * हैदर २०१४ मध्ये आलेला विशाल भारद्वाज दिग्दर्शित हैदर या चित्रपटालाही पाकीस्तानी थिएटर्समध्ये जागा मिळाली नाही. या चित्रपटात काश्मिर संबंधी विवादास्पद मुद्दे असल्याचं कारण पुढे करून तिथल्या सेन्सॉर बोडार्नं यावर बंदी घातली.* नीरजा १९८६ मध्ये मुंबई - न्युयॉर्क विमान दहशतवाद्यांकडून हायजॅक करण्यात आलं. यादरम्यान विमानाच्या केबीन क्रू मेंम्बर असणाऱ्या नीरजा भानोत या शूर भारतीय तरूणीनं स्वत:च्या जीवाचं बलिदान देऊन ३५९ भारतीय-पाकिस्तानी प्रवाशांचा जीव वाचवला. तीची ही कहानी 'नीरजा' या चित्रपटाच्या रूपानं २०१६ मध्ये पडद्यावर आली. पण मुस्लिम आणि पाकिस्तान विरोधी तत्वांचा समावेश असल्याचे कारण देऊन या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली. विशेष म्हणजे नीरजा भानोतला पाकिस्तानकडून मरणोत्तर पुरस्कारही देण्यात आला होता. *रईसया चित्रपटात नायिका म्हणून पाकिस्तानी कलाकार माहीरा खान असल्यानं या चित्रपटाला भारतातल्याच काही संघटना आणि पक्षांकडून विरोध झाला होता. शेवटी शाहरूख आणि राज ठाकरे यांच्या भेटीतून या चित्रपटाची भारतातील प्रदर्शनाची वाट मोकळी झालीही. पण पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने मात्र हा चित्रपट पाकीस्तानात प्रदर्शित होऊ दिला नाही. चित्रपटात मुस्लिमांची चुकीची छबी दाखवली गेलीयं, असं त्यांचं मत आहे.*जॉली एलएलबी 2जॉली एलएलबी या चित्रपटाचा सिक्वेल जॉली एलएलबी 2अक्षय कुमारच्या दमदार अभिनयाच्या जोरावर यावर्षी भारतात चांगली कमाई केली. पण या चित्रपटातही काश्मिरचा उल्लेख आल्याने पाकीस्तानी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला नो एन्ट्रीचा बोर्ड दाखवला!*दंगलकुस्तीपटू महावीर सिंह फोगट आणि त्यांच्या कन्या गीता आणि बबिता फोगट यांच्या जीवनावर आधारलेला आमिरचा दंगल बॉक्स आॅफिसवर तुफान चालला. आतापर्यंत जगभरात या चित्रपटानं कमाईच्या बाबतीत २००० कोटींचा टप्पा पार केलाय. पण चित्रपटात भारतीय राष्ट्रगीत आणि तिरंग्याला जास्त सन्मान दिला गेला असल्याचं सांगून ही दृश्यं कापण्याची मागणी पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डान केली. साहजिकच हे करण्याला आमिर खानने नकार दिल्यामुळे पाकीस्तानी प्रेक्षकांना हा चित्रपटही पाहता आला नाही.