Join us

Video Viral​: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाता गाता संतापला अरिजीत सिंह ! तोंडातून निघाली शिवी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 6:15 AM

अरिजीत सिंह हे नाव माहित नसणारा आज क्वचितचं कुणी असेल. आम्हाला अरिजीत आठवण्याचे कारण म्हणजे, त्याचा सध्या एक वेगाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ.

अरिजीत सिंह हे नाव माहित नसणारा आज क्वचितचं कुणी असेल. बॉलिवूडचा लोकप्रीय गायक अरिजीत सिंह आज चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलाय. एका वेगळ्या उंचीवर पोहोचलायं. आम्हाला अरिजीत आठवण्याचे कारण म्हणजे, त्याचा सध्या एक वेगाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ. होय, या व्हिडिओमुळे अरिजीतला ट्रोल व्हाव लागतेय. आगीच्या वेगाने पसरत असलेल्या या व्हिडिओत अरिजीत एका लाईव्ह शोदरम्यान परफॉर्मन्स करताना दिसतोय आणि लाईव्ह परफॉर्मन्स देता देता अचानक रागाने लालबुंद होत असभ्य भाषेचा वापर करताना दिसतोय. अर्थात हा व्हिडिओ कधीचा, कुठला , हे ठाऊक नाही. पण कदाचित तो अनेक वर्षे जुना असल्याचे वाटतेय.व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत अरिजीत ‘रॉकस्टार’ चित्रपटातील ‘नादान परिंदे’ हे गाणे गातोयं. गाता गाता अचानक माईक ठिक लागला नसल्याचे दिसताच अरिजीत संतापतो आणि असभ्य भाषेत माईक ठिक करण्यास सांगतोयं. अरिजीतचे हा असभ्यपणा निश्चितच लोकांना खटकलाय. याचमुळे सध्या अरिजीतला ट्रोल व्हावे लागतेय. अनेकांनी या व्हिडिओनंतर त्याला आडव्या हातांनी घेतलेयं. एका ट्रोलरने त्याची तुलना ‘अँग्री इंडियन अंकल’सोबत केलीय. एकाने तर थेट अरिजीतला खरी-खोटी सुनवत, ज्या माईकवर तू असभ्य बोलतोय. त्याच माईकने तुला इथपर्यंत पोहोचवलेय, हे विसरू नकोस, असे म्हटलेय.यापूर्वी अरिजीत व सलमानचा वाद चांगलात गाजला होता. एका अवार्ड शोमध्ये सलमान खान होस्ट होता. त्याने अरिजीतला मंचावर येण्याची विनंती केली. पण अरिजीतने सलमानला बराचकाळ ताटकळत ठेवले. बराच वेळानंतर तो मंचावर पोहोचला. मी थकलेला असल्याने मागच्या खुर्चीवर बसलो होतो आणि तिथेच मला डुलकी लागली होती, असे स्पष्टीकरण त्याने त्यावेळी दिले होते. यानंतर अरिजीतने फेसबुकवर पोस्ट लिहून सलमानची माफीही मागितली होती आणि माझ्याकडून ‘सुल्तान’चे गाणे काढून घेऊ नकोस, अशी विनवणीही केली होती. अर्थात तासाभरात अरिजीतने ही पोस्ट डिलीटही केली होती. पण तोपर्यंत हजारो लोक अरिजीतची ती पोस्ट वाचून चुकले होते.