Join us

विधू विनोद चोप्रा यांचे झालेत दोन घटस्फोट, सावत्र भाऊही होते प्रसिद्ध दिग्दर्शक; वाचा इंटरेस्टिंग गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 2:07 PM

'3 इडियट्स', 'संजू', '12th फेल' फेम दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या प्रोफेशनल आयुष्याविषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही इंटरेस्टिंग गोष्टी वाचा. 

हिंदी सिनेमातील लोकप्रिय दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांनी नुकताच '12th फेल' हा सुपरहिट सिनेमा दिला. विक्रांत मेस्सीची भूमिका असलेल्या या सिनेमाचं भरभरुन कौतुक झालं. याआधी त्यांनी 3 इडियट्स, परिंदा, मुन्नाभाई, संजू सारखे ब्लॉकबस्टर हिट दिले. विधू विनोद चोप्रा यांच्या प्रोफेशनल आयुष्याविषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयु्ष्यातील काही इंटरेस्टिंग गोष्टी वाचा. 

विधू विनोद चोप्रा हे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा (Anupama Chopra) यांचे पती आहेत ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहित आहे. पण विधू विनोद चोप्रा यांचं हे तिसरं लग्न आहे. याआधी त्यांचे दोन लग्न मोडल्याचं खूप कमी जणांना माहित असेल.  1976 साली विधू विनोद चोप्रा यांनी वयाच्या २४ व्या वर्षी रेणुका सलुजासोबत लग्न केलं होतं. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना त्यांची ओळख झाली होती. मात्र आपापसातील मतभेदांमुळे लग्नानंतर 7 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर १९८५ साली ते शबनम सुखदेव यांच्याशी लग्नबंधनात अडकले. त्यांना ईशा ही मुलगीही झाली. मात्र लग्नानंतर ४ वर्षात शबनमसोबतही त्यांचा घटस्फोट झाला.

एका भांडणातून झाली विधू विनोद चोप्रा आणि अनुपमा चोप्रा यांची ओळख

विधू विनोद चोप्रा 1990 साली तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले तेव्हा खूप चर्चा झाली. कारण त्यांनी १४ वर्ष लहान अनुपमा चंद्राशी लग्न केले. एका मुलाखतीदरम्यान त्यांची ओळख झाली होती. अनुपमा चंद्रा फिल्म पत्रकार होत्या. पहिल्या मुलाखतीवेळी अनुपमा यांनी असे काही प्रश्न विचारले की विधू विनोद चोप्रा नाराज झाले होते. नंतर अनुपमा परदेशात गेल्या. इतके विधू विनोद चोप्रा यांचा 'परिंदे' सिनेमा रिलीज झाला. अनुपमा यांना हा सिनेमा प्रचंड आवडला. तेव्हा त्यांच्यात ओळख वाढली आणि नंतर ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. ३४ वर्षांपासून त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे. त्यांना झुनी आणि अग्निदेव ही मुलंही आहेत.

आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे विधू विनोद चोप्रा हे 'रामायण' मालिका फेम दिग्दर्शक रामानंद सागर (Ramanand Sagar) यांचे सावत्र भाऊ आहेत. रामानंद सागर यांच्या वडिलांनी पहिल्या पत्नीच्या निधनानंतर विधू विनोद चोप्रा यांच्या आईशी लग्न केलं होतं. रामानंद सागर आणि विधू चोप्रा यांच्यात ३५ वर्षांचं अंतर होतं. रामानंद यांनी विधू चोप्रा यांना सावत्र भाऊ नाही तर मुलगाच मानलं.

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमापरिवार