Ranveer Singh Nude Photoshoot : रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या हेडलाईन्समध्ये आहे. याचं कारण आहे त्याचं न्यूड फोटोशूट. त्याच्या न्यूड फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि ‘हंगामा’ सुरू झाला. सध्या रणवीरच्या न्यूड फोटोशूटवरून वातावरण तापलं आहे. रणवीरविरोधात मुंबई पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. रणवीरवर जबरदस्त टीका होतेय. अशात आता अभिनेत्री विद्या बालन रणवीरच्या बाजूने मैदानात उतरली आहे. विद्या म्हणाली, 'त्यात काय प्रॉब्लेम आहे? एखाद्या माणसाने असे काही करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आम्हाला ही नेत्र सुख घेऊ द्या.
डोळे बंद कराविद्या म्हणाली, "या फोटोशूटमुळे कुणी दुखावलं असेल तर त्यांनी बघू नये. त्याबद्दल वाचायलाही नको. फोटोशूटवर जितकी चर्चा होत आहे, ती वायफळ आहे. तुम्ही एखाद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह लावू शकत नाही. आपण प्रत्येकजण वेगळे आहे. समोरची व्यक्ती काय करत आहे हे तुम्हाला आवडत नसेल तर डोळे बंद करा.'' रणवीर सिंगच्या समर्थनार्थ आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी समोर आले आहेत.
न्यूड फोटोशूटमुळे रणवीरच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांत त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात अनेक कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या कलमाअंतर्गत 7 वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.