झिरो फिगरचा ट्रेंड मोडीत काढणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विद्या बालन (vidya balan). सुंदर दिसणं हे व्यक्तीच्या शरीरावर अवलंबून नसतं तर तिच्यातल्या आत्मविश्वास आणि कलागुणांवर आधारित असतं हे विद्याने दाखवून दिलं. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये तिचा दबदबा आहे. आजवरच्या कारकिर्दीत विद्याने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं.केवळ बॉलिवूडचं नाही तर तिने टॉलिवूडमध्येही काम केलं आहे. त्यामुळे अलिकडेच तिने टॉलिवूड आणि बॉलिवूड या दोघांमध्ये कोणता फरक आहे हे सांगितलं.
अलिकडेच विद्याने मसाबा गुप्ताला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने बॉलिवूड आणि टॉलिवूड या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये कोणता फरक आहे. "मला असं वाटतं की साऊथचे कलाकार फार शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचं काम करतात. तिकडे कायम कमी बजेट, मीडियम साईजचे सिनेमा होतात. त्यामुळे ते काम करताना फार मेहनत करतात. मी कधीच बॉलिवूडमध्ये कोणत्या ब्लॉकबस्टर सिनेमा काम केलं नाहीये. त्यामुळे इथली पद्धत काय असते मला माहित नाही", असं विद्या बालन म्हणाली.
पुढे ती म्हणते, "कोणतीही गोष्टी ऑथेंटिक असणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं साऊथ इंडस्ट्रीत ते जास्त पाहायला मिळतं. बॉलिवूडमध्ये ऑथेंटिक पद्धतीने काय होतंय सांगा? आपल्याला माहितीये का? बॉलिवूड हे माझं कुटुंब आहे. पण, मी एक साऊथ इंडियन आहे. मी बऱ्याच साऊथ स्टार्सला भेटले आहे. ते लोक त्यांच्या कामाकडे नोकरी असल्यासारखं पाहतात. त्यामुळे तुमच्याकडे प्रसिद्धी आहे, तुम्ही सतत चर्चेचा विषय ठरता हे सगळं ठीक आहे. पण, तो कामाचा भाग झाला. काम संपल्यानंतर तुम्ही घरी येता त्यावेळी तुम्ही एक मुलगी, काकू, पत्नी याच भूमिकेत येता. त्यामुळे कायम पाय जमिनीवर असले पाहिजेत."