Join us  

विद्या बालन पडली आजारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2016 1:16 PM

 ‘बेगम जान’ चित्रपटाचे कलाकार सातत्याने आजारी पडताना दिसत आहेत. जास्त वेळ शूटींग केल्याने ते आजारी पडत असल्याचे कळत आहे. ...

 ‘बेगम जान’ चित्रपटाचे कलाकार सातत्याने आजारी पडताना दिसत आहेत. जास्त वेळ शूटींग केल्याने ते आजारी पडत असल्याचे कळत आहे. अभिनेत्री रविझा चौहान हिचे सोडियम-पोटॅशियम कमी झाल्यामुळे तिला हॉस्पिटलाईज करण्यात आल्याचे कळते आहे.तसेच विद्या बालन देखील आजारी पडली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, विद्या अ‍ॅक्शन पॅक मध्यांतरासाठी शूटींग करत होती. त्यानंतर ती फारच अशक्त झाली. मात्र काही वेळ आराम केल्यानंतर ती पुन्हा ठणठणीत झाल्याचे कळते.शूटींग करत असताना गन पावडरच्या वासाने तिला अस्वस्थ केले. त्यामुळे तिला अशक्त केल्याचे कळते.