विद्या बालनने बेगमजानमध्ये दिल्या आहेत शिव्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 01:21 PM2017-03-23T13:21:28+5:302017-03-23T18:51:28+5:30
बेगम जान या चित्रपटात विद्या बालन प्रमुख भूमिका साकारत असून महेश भट्ट या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. लोकमत वुमेन ...
ब गम जान या चित्रपटात विद्या बालन प्रमुख भूमिका साकारत असून महेश भट्ट या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. लोकमत वुमेन समिटमध्ये विद्या आणि महेश यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी महिलांचे हक्क आणि कर्तव्य यांवर तिने भाष्य केले आणि त्याचसोबत त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशनदेखील केले.
बेगमजानबद्दल...
सशक्त आणि बोल्ड भूमिका साकारण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असते. अशाप्रकारच्या भूमिका साकारताना तुम्हाला अभिनय करताना एक प्रकारचे स्वातंत्र्य मिळते. बेगम जान या चित्रपटातील माझी भूमिकादेखील खूप बोल्ड आहे. ती मानमर्यादा या गोष्टींचा कधीच विचार करत नाही. मी माझ्या खऱ्या आयुष्यात कधीच शिव्या देत नाही. पण या चित्रपटात मी शिव्या देतानादेखील प्रेक्षकांना दिसणार आहे. माझा राग शिव्यांच्यामार्फत बाहेर काढण्याची मला या चित्रपटामुळे संधी मिळाली आहे.
आवज उठवणे महत्त्वाचे...
बेगमजान या चित्रपटात लढा देताना ती कोणत्याच गोष्टींना घाबरत नाही. कारण प्रतिष्ठा, मानसन्मान या कोणत्याच गोष्टींची तिला पर्वा नाहीये. पण खऱ्या आयुष्यात महिला कुटुंब, कुटुंबाची इभ्रत, नातेसंबंध या गोष्टींमध्ये अडकलेली असते. त्यामुळे तिचा झालेला छळ, शोषण याबाबत लढा देणे तिच्यासाठी सोपे नसते. पुरुषप्रधान संस्कृतीने बांधून दिलेल्या मर्यांदांमधून बाहेर पडणे तिच्यासाठी अशक्य असते. पण बेगम जानसारख्या चित्रपटांमुळे या गोष्टींचा विचार तरी करायला मदत मिळते आणि आता तरी पण काही काळाने तरी असे चित्रपट स्त्रियांना आपला आवाज उठवण्यासाठी प्रेरित करतात.
सेलिब्रेटींच्या माध्यमातून समाजकार्य
समाजकार्य करणारे, स्वच्छतेसाठी झटणारे अनेक लोक आपल्या देशात आहेत. ते खरे हिरो आहेत. पण जर माझ्यासारख्या अभिनेत्रीने एखादा संदेश दिल्याने समाजात काही बदल होणार असतील, लोकांच्या आयुष्यात काही परिवर्तन होणार असेल तर या गोष्टी करायला मी नक्कीच पुढाकार घेते. लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते.