बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा (Vidya Balan) 'दो और दो प्यार' सिनेमा नुकताच रिलीज झाला. आपल्या अभिनयाने तिने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. महिलाप्रधान सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. आता 'दो और दो प्यार' मधल्या तिच्या भूमिकेचंही कौतुक होतंय. नुकतंच विद्या बाललने एका मुलाखतीत तिला लागलेल्या स्मोकिंगच्या सवयीचा खुलासा केला. एका सिनेमातीलच भूमिकेमुळे तिला ही सवय लागली होती.
एका युट्यूब पॉडकास्टमध्ये विद्या बालन म्हणाली, "मी सिनेमाचं शूटिंग सुरु होण्यापूर्वीच स्मोकिंग केलं. मला स्मोकिंग कसं करतात माहित होतं पण प्रत्यक्षात मी कधी करायचे नाही. पण भूमिका करताना तुम्ही सगळंच खोटं नाही दाखवू शकत. म्हणून मी भूमिकेसाठी स्मोकिंग केलं. सुरुवातीला फार विचित्र वाटत होतं कारण स्मोकिंग करणाऱ्या महिलांबद्दल एक निश्चित धारणा असते. आता जरा कमी झालंय पण आधी महिलांना जज केलं जायचं."
जेव्हा विद्याला विचारण्यात आलं की आता सुद्धा ती स्मोकिंग करते का? त्यावर विद्या म्हणाली, "नाही, मला नाही वाटत मी ही गोष्ट कॅमेऱ्यासमोर बोलली पाहिजे की नाही पण मी स्मोकिंग एन्जॉय करते. जर सिगरेट हानीकारक नसतं तर मी सुद्धा स्मोकिंग करणारी बनले असते. मला त्या धुराचा वास आवडतो. मी तर कॉलेजमध्ये असतानाही बसस्टॉपवर स्मोक करणाऱ्या लोकांच्या शेजारी जाऊन बसायचे. 'द डर्टी पिक्चर' नंतर मला याची नशा लागलेली. मी दिवसातून 2-3 सिगरेट सहज संपवायचे."
वर्कफ्रंट
विद्या बालनचा 'दो और दो प्यार' नुकताच रिलीज झाला. यामध्ये प्रतीक गांधी आणि इलियाना डिक्रुझ यांचीही भूमिका आहे. याआधी तिचा 'नीयत' सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.