बॉलिवूडची उलाला गर्ल अभिनेत्री विद्या बालन हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. विद्या बालन शेवटची गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या बायोपिकमध्ये झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले होते. आता ती शेरनी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला तिने नुकतीच सुरूवात केली आहे.
अभिनेत्री विद्या बालन हिने मध्य प्रदेशमध्ये आगामी चित्रपट शेरनीच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. कोरोनामुळे मार्चच्या मध्यात शेरनीचे शूटिंग थांबवण्यात आले होते. आता आवश्यक त्या काळजीसोबत मध्य प्रदेशमध्ये विद्या बालनने शेरनीचे शूटिंग सुरू केले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन वेटिंग, फोर मोर शॉट्स प्लीज़ सीजन 1 चे दिग्दर्शक अनु मेनन यांनी केले असून अभिनेत्री सान्या मल्होत्रा शंकुतला देवीच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. शंकुतला देवीचे तिच्या मुलीसोबत जटिल, पण असाधारण नाते होते. तसेच या चित्रपटामध्ये जीशू सेनगुप्ता आणि अमित साध हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. विद्या बालनचे चाहते तिला नव्या भूमिकेत पहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.