Join us

विद्या बालन झळकणार आणखीन एका बायोपिकमध्ये, समोर आला फर्स्ट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 13:43 IST

Shakuntala Devi's Biopic : मिशन मंगल चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता विद्या बालन एका बायोपिकमध्ये झळकणार आहे.

मिशन मंगल चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता विद्या बालन एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. गणितज्ज्ञ शकुंतला देवीच्या भूमिकेत विद्या बालन दिसणार आहे.

सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचा चित्रपट विभाग सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रॉडक्शन्स यांनी अ‍ॅबन्डन्शिया एण्टरटेन्मेंटने ‘शकुंतला देवी’ यांच्या जीवनावर आधारित आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘हयूमन कम्प्युटर’ नावाने प्रसिद्ध असलेल्या शकुंतला देवींची महान आणि प्रेरणादायी कहाणी या चित्रपटातून मांडलेली असेल.

शकुंतला देवीने अगदी लहानपणापासूनच झटपट आकडेमोड करण्याच्या आपल्या प्रज्ञेने जगाला टक्का करून सोडले होते. कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नसताना शकुंतला देवींचे नाव जगभरात ‘गणितज्ज्ञ’ म्हणून गाजले. त्यांच्या आकडेमोड करण्याच्या अद्भुत कौशल्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने देखील घेतली.

गुणवान अभिनेत्री विद्या बालन शकुंतला देवींची प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रॉडक्शन्स आणि विक्रम मल्होत्रा करणार आहेत. अनू मेनन आणि नयनिका मेहता यांनी चित्रपटची पटकथा लिहिली असून इशिता मोईत्रा यांनी संवाद लेखन केले आहे.

मानवी मेंदू आणि मानवी संबंध यांची अनोखी गोष्ट सांगणारा हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :विद्या बालनआत्मचरित्रमिशन मंगल