राजेश खन्नाचा ‘हाथी मेरे साथी’, जॉकी श्रॉफचा ‘तेरी मेहरबानियां’ या सदाबहार चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता या यादीत आणखी एका माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीचे दर्शन घडवणा-या चित्रपटाची भर पडणार आहे. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘जंगली’. चित्रपटाचे नाव ऐकून यात काय असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. होय, आपल्या जंगलांची आजची स्थिती यात दर्शवण्यात आली आहे. काही क्षणांपूर्वी ‘जंगली’चा ट्रेलर रिलीज झाला. अभिनेता विद्युत जामवाल यात मुख्य भूमिकेत आहे. जंगली शिका-यांपासून प्राण्यांचे रक्षण करताना तो दिसतोय. इमोशन आणि अॅक्शन अशा दोन्हींचा तडका असलेला हा सोशल मीडियावर जबरदस्त हिट ठरला आहे.
विद्युत जामवाल आणि भोलाच्या मैत्रीची कथा! पाहा, ‘जंगली’चा ट्रेलर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 13:19 IST
राजेश खन्नाचा ‘हाथी मेरे साथी’, जॉकी श्रॉफचा ‘तेरी मेहरबानियां’ या सदाबहार चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता या यादीत आणखी एका माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीचे दर्शन घडवणा-या चित्रपटाची भर पडणार आहे. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘जंगली’.
विद्युत जामवाल आणि भोलाच्या मैत्रीची कथा! पाहा, ‘जंगली’चा ट्रेलर!!
ठळक मुद्दे माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीचे दर्शन घडवणारा या ट्रेलरमध्ये हस्तीदंताच्या तस्करीसाठी हत्तींची होणारी शिकार, शिका-यांच्या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले संबंध अशा वेगवेगळ्या मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.