Join us

'कमांडो ३'मध्ये विद्युत जामवाल दिसणार दमदार अ‍ॅक्शन करताना, पहा त्याची ही झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 17:19 IST

Commando 3 Movie : विद्युत जामवालचा बहुचर्चित चित्रपट 'कमांडो ३' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूडचा कमांडो म्हणजेच अभिनेता विद्युत जामवालचा बहुचर्चित चित्रपट 'कमांडो ३' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील विद्युत जामवालचा एन्ट्री सीन नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सीन विद्युतने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरदेखील शेअर केला आहे. 

विद्युत जामवालने इंस्टाग्रामवर 'कमांडो ३' मधील सीक्वेन्स शेअर करत लिहिले की, 'यह तो शुरूवात है. २९ नोव्हेंबर को देखो होता है क्या?'

विद्युतने शेअर केलेला हा व्हिडिओ ५ मिनिटांचा आहे. यात शाळेत जाणाऱ्या मुलींना पहेलवान त्रास देताना दिसतो आहे. पहेलवान एका मुलीसोबत वाईट कृत्य करण्याच्या हेतूत असतानाच विद्युतची एन्ट्री होते आणि तो त्या पहेलवानांना चांगलाच धडा शिकवतो. हा व्हिडिओ ५ मिनिटांचा जरी असला तरी त्यात तो दमदार अ‍ॅक्शन करताना दिसतो आहे.  

'कमांडो ३' हा चित्रपट कमांडो चित्रपटाची तिसरी फ्रंचाइजी आहे. यात विद्युतसोबत अदा शर्मादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर गुलशन देवैया यात निगेटिव्ह भूमिका करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्तने केले आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :विद्युत जामवालकमांडो