View pic : सात महिन्यांचा झाला तैमूर; मावशी करिष्मा कपूरने असे केले विश!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2017 2:23 PM
सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा लाडका तैमूर कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. कधी पावसाचा ...
सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा लाडका तैमूर कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. कधी पावसाचा आनंद घेण्याच्या कारणावरून तर कधी त्याच्या महागड्या शूजवरून माध्यमांमध्ये त्याची चर्चा रंगत असते. आता तैमूर सात महिन्यांचा झाला असून, हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी कपूर परिवाराने एका खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतील एक खास फोटो आम्हाला मिळाला असून, फोटोमध्ये मावशी करिष्मा कपूरने तैमूरचे कशा पद्धतीने विश केले आहे, हे दिसून येते. फोटोमध्ये एक सुंदर असा चॉकलेट फ्लेव्हरचा केक दिसत आहे. केकवर लिहिले आहे की, ‘हॅपी सेवेंथ मंथ बर्थडे तैमूर’ शिवाय ‘आमचा बेबी सात महिन्यांचा झाला आहे’ असेही केकवर लिहिलेले आहे. केकचा हा फोटो तैमूरची मावशी करिष्मा कपूर हिने सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यास चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे. २० डिसेंबर २०१६ रोजी तैमूरचा जन्म झाला. जन्मत:च तैमूर माध्यमांमध्ये चर्चेत आला. कुठल्या ना कुठल्या कारणाने तो चर्चेत असतो. सोशल मीडियावर तर त्याचे फोटो आणि व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असतात. नुकतेच एका इव्हेंटदरम्यान मम्मी करिनाने तैमूरविषयी म्हटले होते की, ‘काळ खूप बदलला आहे. आम्ही कुठेही जात असलो तरी, फोटोग्राफर्स आमचे फोटोज् काढत असतात. तैमूर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच आहे. मग त्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीट का करावे? यावेळी करिनाने हेदेखील स्पष्ट केले होते की, तैमूर एक सुंदर मुलगा आहे. खरं तर करिनाचे हे वक्तव्य शंभर टक्के खरे आहे. कारण तैमूर खूपच गोंडस मुलगा असून, त्याची एक झलक बघण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियावर तर त्याचा प्रत्येक फोटो व्हायरल होत असतो. असो, तैमूर सात महिन्यांचा केव्हा झाला ही बाब कळलीच नाही. त्याच्या या सातव्या महिन्याच्या जन्मदिवसानिमित्त आमच्याकडूनही त्याला भरपूर शुभेच्छा.