Join us

'झुंड' ज्यांच्यावर बनला त्या विजय बारसेंची सिनेमावर प्रतिक्रिया, म्हणाले- इतक्या वर्षांची मेहनत रूपेरी पडद्यावर झळकणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 12:18 PM

या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे.

‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे (Nagraj Popatrao Manjule) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ (Jhund ) नावाचा त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या आज भेटीस आाला आहे. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन, त्यामुळेच सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी या सिनेमाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

विजय बारसे हे स्लम सौकर चे निर्माता आहे. झोपडपट्टीतील मुलांना आपल्या खिशातून पैसे देऊन फुटबॉल शिखवण्याचं काम यांनी केलं आहे. विजय बारसे यांनी जे अनेक वर्षे जे काम केलं आहे त्या वर आधारित दिरदर्शक नागराज मंजुळे यांचा हा झुंड सिनेमा आहे. विजय बारसे यांना खूप आनंद होत आहे की त्यांनी अनेक वर्षांपासून केलेलं कार्य आज रूपेरी पडद्यावर झळकणार..आता विजय बारसे डेव्हलपमेंट ऑफ फुटबॉल यावर आपला लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी सांगितले.नागराजला सिनेमात माझं कार्य जसं आहे तसं दाखवण्यास सांगितलं होतं. नागराजने ते तसंच पडद्यावर मांडलं आहे. आता मला फक्त नागपूरसाठी नाही तर देशासाठी खेळाडू तयार करायचे आहेत, असं विजय बारसे म्हणाले.

आमिर खानसाठी ‘झुंड’चं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं, ‘झुंड’ पाहून आमिर खानला त्याचे अश्रू रोखता आले नाहीत. हा मी पाहिलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिलीये. समीक्षकांनीही या सिनेमाचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चननागराज मंजुळे