तेलगु सुपरस्टार आणि साऊथ इंडस्ट्रीत ‘अर्जुन रेड्डी’ नावाने ओळखला जाणारा अभिनेता विजय देवरकोंडा पुन्हा चर्चेत आहे. लवकरच तो अनन्या पांडेसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सध्या विजय व अनन्या मुंबईत ‘फायटर’ या सिनेमाचे शूटींग करत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘फायटर’च्या सेटवरचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या फोटोत अन्यया विजयसोबत बाईकच्या फ्युएल टँकवर बसलेली दिसली होती. आता पुन्हा एकदा या दोघांचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोत अनन्या उभी आहे आणि विजय खाली बसून तिच्या कमरेला हग करतोय. हा सीन देताना अनन्या काहीशी अनकम्फर्टेबल दिसतेय. तिच्या चेह-यावरचे भाव बरेच काही सांगणारे आहेत.
या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. काही युजर्सनी तर दीपवीर व विरूष्काच्या धर्तीवर अनन्या व विजय यांना ‘अनाकोंडा’ हे नाव बहाल केले आहे.
‘फायटर’ हा सिनेमा हिंदी व तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. याशिवायदेखील आणखीन काही भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, चार्मी कौर, अपूर्व मेहता करत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अनन्या या चित्रपटाशिवाय ‘खाली पीली’ या सिनेमातही झळकणार आहे. यात ती इशान खट्टरसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसेल. याशिवाय दीपिका पादुकोण व सिद्धांत चतुर्वेदीसोबतचा आणखी एक सिनेमा तिने साईन केला आहे. विजय देवरकोंडा याच्याकडेही ‘फायटर’शिवाय ‘हिरो’ हा सिनेमा आहे.