तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार विजय देवरकोंडा ‘अर्जुन रेड्डी’ सिनेमामुळे भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. त्यानंतर या चित्रपटाचा हिंदी रिमेक आला कबीर सिंग. या चित्रपटात मुख्य भूमिकेत शाहिद कपूर होता. पण या चित्रपटामुळे बॉलिवूडमध्येही विजय देवरकोंडा चर्चेत आला. आता तर विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
धर्मा प्रोडक्शन, दाक्षिणात्य अभिनेत्री चार्मी कौर व दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांची निर्मिती असलेला चित्रपट 'फाइटर' चित्रपटात तो झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. निर्मात्यांनी मुहूर्तादरम्यान पुजेचा फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.
'फाइटर' चित्रपटात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाध करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगची सुरूवात एका लग्नाच्या सीनपासून झाली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर बाहुबली फेम राम्या कृष्णन व रोनित रॉय प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटातील काही भाग देशाबाहेर चित्रीत केला जाणार आहे. या चित्रपटासाठी विजने थायलंडमधून मार्शल आर्ट्सचे धडे गिरविले आहेत.