Join us  

Liger Trailer : लव्ह, रोमान्स, अ‍ॅक्शन, अ‍ॅग्रेशन अन् विजय देवरकोंडाचा स्वॅग...! ‘लाइगर’चा ट्रेलर एकदा पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:27 AM

Liger Trailer : ‘लाइगर’चा ट्रेलर दमदार आहे. टीझर सारखाच ‘लाइगर’चा ट्रेलरही तुम्हाला निराश करणार नाही. या ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन आहे, अ‍ॅग्रेशन आहे, ड्रामा आहे आणि रोमान्सही आहे.

Liger Trailer : अखेर प्रतीक्षा संपली...! 2022 ची बिगेस्ट मास अ‍ॅक्शन फिल्म ‘लाइगर’चा (Liger) ट्रेलर रिलीज झाला आहे. साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर कधी एकदा रिलीज होतो, असं चाहत्यांना झालं होतं. अखेर ट्रेलर रिलीज झाला. सध्या सोशल मीडियावर याच ट्रेलरची चर्चा आहे. अवघ्या अर्ध्या तासात 1 लाखांपेक्षा अधिक लोकांनी ‘लाइगर’चा ट्रेलर पाहिला, यावरून तुम्ही अंदाज बांधू शकताच.

 ‘लाइगर’चा ट्रेलर दमदार आहे. टीझर सारखाच ‘लाइगर’चा ट्रेलरही तुम्हाला निराश करणार नाही. विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) व अनन्या पांडेची (Ananya Panday) मुख्य भूमिका असलेल्या या ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन आहे, अ‍ॅग्रेशन आहे, ड्रामा आहे आणि रोमान्सही आहे. 2.02 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये फार काही संवाद नाहीत. तर जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्सची भरमार आहे. विजय देवरकोंडा आणि त्याचे अ‍ॅक्शन सीक्वेन्स पाहताना अंगावर शहारे येतात. त्याचा डॅशिंग अंदाज थक्क करतो.

ट्रेलरमध्ये तो किक बॉक्सरच्या भूमिकेमध्ये दिसतोय. ट्रेलरमध्ये विजय अडखळत फक्त 2-3 डायलॉग बोलतो. पण या दोन तीन डायलॉगमध्येच तो मन जिंकून घेतो. त्याचा स्वॅग वेगळाच आहे. ट्रेलरमध्ये अनन्या पांडे सुद्धा भाव खाऊन जाते. विजय देवरकोंडाच्या आईच्या भूमिकेत असलेली राम्या कृष्णन हिचा रोलही बिनधास्त आहे. ती लेकापेक्षा कमी अ‍ॅग्रेसिव्ह नाही. मराठमोठा अभिनेता मकरंद देशपांडे, अमेरिकन किक बॉक्सर माइक टायसन यांची झलकही ट्रेलरमध्ये दिसते.

‘लाइगर’ हा एक स्पोर्ट्स अ‍ॅक्शन ड्रामा आहे. साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं  तर करण जोहर याचा निर्माता आहे. अनन्याचा हा पहिलाच तेलुगू चित्रपट असेल. हा चित्रपट हिंदीतही रिलीज होणार आहे.  येत्या 25 ऑगस्टला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे.

टॅग्स :विजय देवरकोंडाअनन्या पांडेTollywood