Join us

Liger Box office Collection day 1: हिट की फ्लॉप? विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ने पहिल्या दिवशी किती केली कमाई?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 11:45 AM

Liger Box office Collection day 1: आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हे अलीकडे रिलीज झालेले दोन्ही सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर विजय देवरकोंडा काय कमाल करतो, हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच आहे....

Liger Box office Collection day 1: साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) ‘लाइगर’ (Liger) हा सिनेमा रिलीज झाला आहे. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हे अलीकडे रिलीज झालेले दोन्ही सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर विजय देवरकोंडा काय कमाल करतो, हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच आहे. तर सिनेमाच्या फर्स्ट डेचे बॉक्स ऑफिस नंबर्स समोर आले आहेत.पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केलेला ‘लाइगर’ हा एक स्पोर्ट ड्रामा आहे. या चित्रपटाद्वारे विजय देवरकोंडाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. हिंदीसोबत तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड अशा भाषांत हा सिनेमा रिलीज झालाये.

विजय देवरकोंडाचा हा सिनेमा बॉलिवूडला नवसंजीवनी देणारा ठरेल, अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. विजय देवरकोंडाची लोकप्रियता लक्षात घेता, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, अशीही सर्वांची अपेक्षा होती. अशात या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केलीये? तर चांगली. बॉक्स ऑफिसचे पहिल्या दिवशीच्या आकड्यानुसार, विजय देवरकोंडाच्या या पहिल्या हिंदी सिनेमाने आमिर आणि अक्षयच्या चित्रपटापेक्षा जास्त नफा कमावला आहे. पण खरी अग्निपरिक्षा पुढे आहे.चित्रपटावर समीक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. प्रेक्षकांनी प्रचंड निगेटीव्ह कमेंट्स दिल्या आहेत. या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे बॉक्स ऑफिसच्या कमाईवर किती परिणाम होतो, हे लवकरच दिसणार आहे.

आंध्र बॉक्स ऑफिससनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी वर्ल्डवाईड 24.5 कोटींची कमाई केली. तेलगू बेल्टमध्ये या चित्रपटाने सर्वाधिक 15 कोटींची कमाई केली. हिंदी व्हर्जनने केवळ 5 कोटींचा बिझनेस केला. विजय देवरकोंडाची फॅनफॉलोइंग बघता, हिंदी बेल्टमधील चित्रपटाच्या कमाईने मेकर्स प्रचंड निराश असल्याचं कळतंय.

  निगेटीव्ह रिव्ह्यूमुळे होणार मोठं नुकसान?‘लाइगर’चं देशभर जबरदस्त प्रमोशन झालं होतं. विजय देवरकोंडाने प्रमोशनचा धडाका लावला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात अ‍ॅडव्हान्स बुकिंग झालं होतं. पण चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. ट्विटरवर प्रेक्षकांनी या चित्रपटावर निगेटीव्ह रिव्ह्यू दिले आहेत. मात्र याऊपर अ‍ॅडव्हान्स बुकिंगमुळे ‘लाइगर’ला ग्रँड ओपनिंग मिळाली. पण दुपारच्या शोमध्ये निगेटीव्ह रिव्ह्यूचा परिणाम स्पष्टपणे जाणवला.

 त्यामुळे पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवरून विजय देवरकोंडा बॉलिवूडवर राज्य करेल असं म्हणता येणार नाही. चित्रपटाला प्रचंड नकारात्मक प्रतिकिया मिळत आहेत. त्यामुळे चित्रपटाची कमाई पुढे वेग घेणार की मंदावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :विजय देवरकोंडाबॉलिवूडअनन्या पांडे