Join us

विजय देवरकोंडाचा 'लायगर' ठरला सुपरफ्लॉप; दिग्दर्शकावर आली मुंबईतील घर सोडून हैदराबादला परतण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 1:06 PM

साउथ स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे अभिनीत 'लायगर' (Liger) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला.

साउथ स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे अभिनीत 'लायगर' (Liger) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. याआधी चित्रपटाविषयी खूप चर्चा होती, पण जेव्हा तो चित्रपटगृहात रिलीज झाला तेव्हा त्याला रिस्पॉन्स मिळणं कठीण झालं आणि चित्रपट फ्लॉप ठरला. निर्माते वितरकांना पैसे परत करण्याचा विचार करत आहेत जेणेकरून किमान त्यांचे नुकसान भरून काढता येईल, अशी बातमी समोर येत आहे. दरम्यान आता मोठी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'लायगर' चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ (Puri Jagannath) मुंबईतील आपला फ्लॅट रिकामा करून हैदराबादमध्ये परत जाण्याचा विचार करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुरी जगन्नाथ मुंबईतील एका पॉश सोसायटीमध्ये सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. या घराचे महिन्याचे भाडे १० लाख रुपये असून, देखभालीचा खर्च वेगळा द्यावा लागतो. मात्र चित्रपट अपयशी ठरल्यानंतर पुरी जगन्नाथ मुंबईसोडून पुन्हा हैदराबादला जाण्याचा विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुरी जगन्नाथ लवकरच आपला फ्लॅट रिकामा करणार आहे, कारण त्याला तो आता परवडत नाहीये.

अशीदेखील बातमी समोर आली होती की 'लायगर’ वाईटरित्या फ्लॉप झाल्यानंतर पुरी जगन्नाथने विजय देवरकोंडासोबतचा त्यांचा आगामी चित्रपट 'जन गण मन' अनिश्चित काळासाठी होल्डवर ठेवला आहे. २५ ऑगस्ट रोजी 'लायगर’ रिलीज होण्यापूर्वी, विजय देवरकोंडा आणि पुरी जगन्नाथ हे 'जन गण मन' नामक  आणखी एका प्रोजेक्टवर एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 

टॅग्स :विजय देवरकोंडाअनन्या पांडे