Join us

कुमार गौरवसोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवणारी विजेयता आज जगतेय एकाकी आयुष्य...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 8:00 AM

‘लव्ह स्टोरी’ या ब्लॉकबस्टर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री विजेयता पंडित आज कुठे आहे ?. 

ठळक मुद्दे80 च्या दशकात विजेयताने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि पहिल्याच सिनेमाने ती एका रात्रीत स्टार झाली.

‘लव्ह स्टोरी’ या ब्लॉकबस्टर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री विजेयता पंडित आज कुठे आहे तर आर्थिक तंगीचा सामना करत एकाकी जीवन जगतेय. पहिल्या पतीने विश्वासघात केला आणि दुस-या पतीचे कॅन्सरने अकाली निधन झाले, तेव्हापासून विजेयता एकाकी जीवन जगतेय. 

80 च्या दशकात विजेयताने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि पहिल्याच सिनेमाने ती एका रात्रीत स्टार झाली. 1980 मध्ये अभिनेते आणि दिग्दर्शक राजेन्द्र कुमार आपला मुलगा कुमार गौरव याच्या डेब्यूची तयारी करत होते. मुलासोबत एक नवी हिरोईन घेण्याचा त्यांचा विचार होता. अशात या सिनेमासाठी विजेयताचे नाव फायनल झाले आणि 1981 साली कुमार गौरव व विजेयता यांचा ‘लव्ह स्टोरी’ हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. विशेष म्हणजे, या सिनेमाच्या सेटवर कुमार गौरव व विजेयता यांची ‘लव्ह स्टोरी’ ही सुरु झाली.

सिनेमात काम करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्नाचा निर्णयही घेतला. पण राजेंद्र कुमार यांना हे नाते मान्य नव्हते. अखेर कुटुंबाच्या मर्जीखातर विजेयता व कुमार गौरव यांनी आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला आणि दोघांचेही मार्ग वेगवेगळे झाले. पुढे तीनच वर्षांनी कुमार गौरवने सुनील दत्त यांची लेक नम्रतासोबत लग्न केले.

कुमार गौरव आपल्या आयुष्यात बराच पुढे निघून गेला. पण विजेयता मात्र आतून कोलमडली होती. पहिला सिनेमा सुपरहिट होऊनही चार वर्षे तिला काम मिळाले नाही. शिवाय प्रेमातही ती अपयशी ठरली. चार वर्षांनंतर विजेयताने मोहब्बत व मिसाल या सिनेमातून कमबॅक केले. मात्र हे दोन्ही सिनेमे आपटले. यानंतर ‘कार थीफ’ या सिनेमात ती दिसली. यात विजेयता बोल्ड रूपात झळकली. पण हा सिनेमाही तितकाच दणकून आपटला. पण हो या सिनेमाच्या सेटवर तिला जोडीदार मिळाला.

‘कार थीफ’चे दिग्दर्शक समीर माकलनसोबत विजेयताने संसार थाटला. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. 1986 मध्ये लग्न झाले आणि 1988 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

1990 साली विजेयताने सुप्रसिद्ध गीतकार आदेश श्रीवास्तवशी लग्न केले. दोघांना अनिवेश व अवितेश अशी दोन मुले झाली. मात्र कालांतराने आदेश यांचे कॅन्सरने निधन झाले. पतीच्या निधनानंतर विजेयतालाआर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अगदी घरातील साहित्य विकण्याचीही वेळ तिच्यावर आली.

टॅग्स :बॉलिवूड