Join us

मी खूप चुका केल्यात...!  40 वर्षांनंतर  विजयता पंडितने कुमार गौरवसोबतच्या अफेअरवर सोडले मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 4:51 PM

‘लव्ह स्टोरी’ हा सिनेमा रिलीज झाला आणि 40 वर्षांपूर्वी एक चेहरा सर्वांच्या डोळ्यात भरला. हा चेहरा होता अभिनेत्री विजयता पंडितचा.

ठळक मुद्दे1990 साली  विजयताने सुप्रसिद्ध गीतकार आदेश श्रीवास्तवशी लग्न केले. दोघांना अनिवेश व अवितेश अशी दोन मुले झाली. मात्र कालांतराने आदेश यांचे कॅन्सरने निधन झाले.

‘लव्ह स्टोरी’ हा सिनेमा रिलीज झाला आणि 40 वर्षांपूर्वी एक चेहरा सर्वांच्या डोळ्यात भरला. हा चेहरा होता अभिनेत्री विजयता पंडितचा. पहिल्याच सिनेमाने विजयता स्टार झाली. हीच विजयता तब्बल 40 वर्षांनंतर कमबॅक करतेय. यानिमित्ताने विजयताने नुकतीच एक मुलाखतीत दिली. या मुलाखतीत विजयता पहिल्यांदा तिच्या व कुमार गौरवच्या अफेअरबद्दल बोलली.

 80 च्या दशकात विजयताने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि पहिल्याच सिनेमाने ती एका रात्रीत स्टार झाली. 1980 मध्ये अभिनेते आणि दिग्दर्शक राजेन्द्र कुमार आपला मुलगा कुमार गौरव याच्या डेब्यूची तयारी करत होते. मुलासोबत एक नवी हिरोईन घेण्याचा त्यांचा विचार होता. अशात या सिनेमासाठी विजयताचे नाव फायनल झाले आणि 1981 साली कुमार गौरव व विजयता यांचा ‘लव्ह स्टोरी’  हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाल आणि या सिनेमासोबत   कुमार गौरव व विजयता यांच्या ‘लव्ह स्टोरी’ची चर्चाही सुरु झाली.  

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत विजयताला या अफेअरबद्दल विचारण्यात आले. यावर, मला आता यावर चर्चा नको, असे ती म्हणाली. आता माझा मुलगाही मोठा झाला आहे. आता मी यावर उगाच चर्चा करू इच्छित नाही, असे ती म्हणाली.

‘लव्हस्टोरी’नंतर अनेकजण विजयता व कुमार गौरवला घेऊन सिनेमा बनवू इच्छित होते. कुमारसोबत तिला अनेक सिनेमे आॅफर्स झालेत. पण विजयताने हे सगळे सिनेमे नाकारले. आता ती माझी चूक होती, असे विजयताने म्हटले आहे. मी पर्सनल कारणांमुळे ते सिनेमे नाकारले होते. पण ती माझी चूक होती, असे ती मुलाखतीत म्हणाली.

असे म्हणतात की, विजयता व कुमार गौरव दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनी लग्नाचा निर्णयही घेतला होता. पण राजेंद्र कुमार यांना हे नाते मान्य नव्हते. अखेर कुटुंबाच्या मजीर्खातर विजयता व कुमार गौरव यांनी आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला आणि दोघांचेही मार्ग वेगवेगळे झाले. पुढे तीनच वर्षांनी कुमार गौरवने सुनील दत्त यांची लेक नम्रतासोबत लग्न केले.

कुमार गौरव आपल्या आयुष्यात बराच पुढे निघून गेला. पण विजयता मात्र आतून कोलमडली होती. पहिला सिनेमा सुपरहिट होऊनही चार वर्षे तिला काम मिळाले नाही. शिवाय प्रेमातही ती अपयशी ठरली. चार वर्षांनंतर विजेयताने मोहब्बत व मिसाल या सिनेमातून कमबॅक केले. मात्र हे दोन्ही सिनेमे आपटले. यानंतर ‘कार थीफ’   या सिनेमात ती दिसली. यात विजयता बोल्ड रूपात झळकली. पण हा सिनेमाही तितकाच दणकून आपटला. पण हो या सिनेमाच्या सेटवर तिला जोडीदार मिळाला.

‘कार थीफ’चे दिग्दर्शक समीर माकलनसोबत विजयताने संसार थाटला. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. 1986 मध्ये लग्न झाले आणि 1988 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.1990 साली  विजयताने सुप्रसिद्ध गीतकार आदेश श्रीवास्तवशी लग्न केले. दोघांना अनिवेश व अवितेश अशी दोन मुले झाली. मात्र कालांतराने आदेश यांचे कॅन्सरने निधन झाले. पतीच्या निधनानंतर विजयताला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. अगदी घरातील साहित्य विकण्याचीही वेळ तिच्यावर आली होती.

टॅग्स :बॉलिवूड