बॉलिवूडच्या इतिहासातील अजरामर ठरलेला सिनेमा म्हणजे शोले (sholay). या सिनेमाच्या उत्तम कथानकासह त्यातील कलाकारही रातोरात सुपरस्टार झाले. जय, वीरु आणि बसंती या पात्रांनी तर अक्षरश: प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. त्यातलीच एक भूमिका म्हणजे कालिया. ही भूमिका दिवंगत अभिनेता विजू खोटे यांनी साकारली होती. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी त्यांनी अत्यंत किरकोळ मानधन घेतलं होतं.
विजू खोटे यांनी साकारलेली कालिया ही भूमिका विशेष गाजली. यात गब्बर आणि त्यांच्यातील संवादावर तर प्रेक्षकांनी कडाडून टाळ्या वाजवल्या. 'अबे ओ कालिया, अब तेरा क्या होगा?, असा प्रश्न गब्बर विचारतो. त्यावर ‘कु..कु..छ नही सरकार, मैने तो आपका नमक खाया हैं...’, असं उत्तर कालियाने दिलं. त्यांचा हा संवाद सुपरडुपर हिट झाला होता. विशेष म्हणजे लोकप्रिय ठरलेल्या कालियाच्या भूमिकेसाठी विजू खोटे यांनी किरकोळ मानधन घेतलं होतं.
किती होतं विजू खोटे यांचं मानधन
कालियाची भूमिका अजरामर करणाऱ्या विजू खोटे यांनी या सिनेमासाठी केवळ 2500 इतकं किरकोळ मानधन स्वीकारलं होतं. परंतु, त्यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. दरम्यान,‘या मालक’ हा विजू खोटे यांचा पहिला डेब्यू सिनेमा होता. 1964 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची निर्मिती विजू खोटे यांच्या वडिलांनी नंदू खोटे यांनी केली होती. विजू खोटे यांनी जवळ जवळ 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केली. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अगदी लहान लहान भूमिका केल्यात.