Join us

"वयाच्या ५० व्या वर्षी मी...", विक्रम भट यांची आमिर खानच्या साठीतील अफेअरवर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 08:48 IST

विक्रम भट यांनी मांडलं सत्य, म्हणाले, "ती व्यक्ती..."

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) वयाच्या साठाव्या वर्षी प्रेमात पडला आहे. दोन घटस्फोटांनंतर आता तो ४६ वर्षीय गौरी स्प्रॅटला डेट करत याहे. गौरी बंगळुरुची असून दोघंही गेल्या दीड वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. विशेष म्हणजे त्यांची २५ वर्षांची ओळख आहे. आमिरने आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी माध्यमांसमोर गौरीची ओळख करुन दिली. यानंतर बीटाऊनमध्ये आमिरच्या या वयातील अफेअरची चर्चा सुरु झाली. नुकतंच निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम भट (Vikram Bhatt) यांनी आमिरच्या अफेअरवर त्यांचं मत मांडलं आहे.

विक्रम भट नुकतंच ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले,"जर मी  वयाच्या ५०व्या वर्षी लग्न करु शकतो तर आमिरला साठाव्या वर्षी पार्टनर मिळू शकत नाही का? वय हा केवळ आकडा आहे. आनंद साजरा करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. जसं जसं आयुष्य पुढे जातं रिलेशनशिप आणि सेक्शिएलिटी महत्वाची नसते तर एक कंपॅनियनशिप गरजेची असते. आपल्याला एकटं राहायचं नसतं. कोणीतरी तुमचा हात पकडणारी, तुम्हाला समजून घेणारी, सगळं काही ठीक होईल असा दिलासा देणारी व्यक्ती तुम्हाला या वयात आयुष्यात हवी असते. जर आमिरला ती व्यक्ती मिळाली आहे तर मी त्याच्यासाठी खूप खूश आहे. त्याचं सगळं चांगलं व्हावं अशी माझी इच्छा आहे कारण तो खूप चांगला माणूस आहे आणि आनंदी राहण्यासाठी पात्र आहे."

विक्रम भट यांचा 'तुमको मेरी कसम' सिनेमा २१ मार्च रोजी रिलीज होत आहे. त्यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अदा शर्मा, ईशा देओल, इश्वक सिंह, अनुपम खेर यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. या सिनेमाच्या प्रमोनशवेळीच विक्रम भट यांनी आमिर खानच्या विषयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

विक्रम भट यांनी खूप कमी वयात अदितीसोबत लग्न केलं होतं. १९९८ साली त्यांचा घटस्फोट झाला. नंतर  वयाच्या ५२ व्या वर्षी ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले. त्यांनी श्वेतांबरी सोनीसोबत लग्नगाठ बांधली. याशिवाय त्यांचे अनेक अफेअर्सही चर्चेत राहिले आहेत. त्यांना कृष्णा भट ही मुलगी आहे. 

टॅग्स :विक्रम भटआमिर खानरिलेशनशिपबॉलिवूड