काही दिवसांपूर्वी विकास बहलवर फॅन्टम कंपनीतील एका महिला कर्माचाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी या कंपनीतील भागीदार निर्माता अनुराग कश्यपनंतर आणखीन एक भागीदार विक्रमादित्य मोटवानीनेदेखील अखेर आपले मौन तोडले आहे. मोटवानी यांचे हे विधान अनुराग कश्यपने ट्विटरवर माफी मागितल्यानंतर आले आहे. एका महिला दिग्दर्शिकेने विकास बहलवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. ही घटना तीन वर्षांपूर्वी बॉम्बे वेलवेट चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी घडली होती.
काही दिवसांपूर्वी आरोपांनंतर फेमस आणि सफल प्रोडक्शन हाऊस फॅन्टम फिल्म्सच्या चार पार्टनरसोबत अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, विकास बहल आणि मधु मंटेना वेगळे झाले होते. या प्रोडक्शन हाऊसचे भागीदार अनुराग कश्यपने माफी मागत या प्रकरणाबद्दल माहित असल्याचे सांगितले होते. मात्र ते त्यावेळी त्या महिलेची मदत करायची होती. पण करता आली नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, याबद्दल माहित असतानादेखील कंपनीच्या नियमानुसार याप्रकरणी काहीच करता आले नाही. ऑफिशियल लेवलवर त्या महिलेसाठी काही करू शकलो नाही. मात्र खासगी पातळीवर त्या पीडितेची मदत केली. अनुराग कश्यपने ट्विटरवर पोस्ट शेअर करून पीडित महिलेची माफी मागितली होती.अनुरागनंतर फॅन्टम फिल्म्सचा दुसरे भागीदार विक्रमादित्य मोटवानीने या घटनेसाठी माफी मागितली आणि म्हणाले की, मी माझ्या सेटवर सुरक्षित वर्किंग माहौलचा आश्वासन देतो. त्या महिलेवर जे काही घडले तो लाजिरवाणा प्रकार होता. त्यासाठी मी तिची माफी मागतो. विकास बहलने लैंगिक शोषण केले आहे. त्याने तरूण महिलेला आपले शिकार बनवले आहे. तिचा विश्वास तोडला आहे आणि तिचे जीवन संपवले आहे. ही जखम कधीही भरून न निघणारी अशी आहे. आता मी फक्त माफी मागू शकतो. आता मी एवढेच सांगू शकतो की, माझ्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तीसोबत असे काही घडणार नाही, याची मी काळजी घेईन.मोटवानी यांना या घटनेबद्दल मार्च 2017पर्यंत काहीच माहित नव्हते. त्यांना अनुराग कश्यपने फोनवर सगळा प्रकार सांगितला होता. ते म्हणाले की, मला या घटनेबद्दल समजल्यानंतर मधु, मी व अनुराग त्या महिलेला भेटलो. तिच्याकडून त्या घटनेबद्दल सर्व जाणून घेतले. ते ऐकून आम्ही खूप हैराण झालो होतो. त्यानंतर आम्ही लगेच अॅक्शन घेतली व कंपनीतून विकासला बेदखल केले होते.