Join us

Vikrant massey ला बाथरुमच्या रांगेत मिळालं पहिलं काम; एकेकाळी करत होता बालमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 11:43 AM

Vikrant massey: विक्रांत मेस्सीचा कलाविश्वातला प्रवास सोपा नव्हता.

आयुष्यात स्ट्रगल हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो. फक्त प्रत्येकाचं स्वरुप वेगवेगळं असतं. काहींना अथक मेहनत करुन स्वत:ला सिद्ध करावं लागतं. सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. नुकताच हा अभिनेता 12 th Fail  या सिनेमात झळकला असून त्याने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. परंतु, या अभिनेत्याने खऱ्या आयुष्यात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अथक परिश्रम घेतले असून त्याने बालमजुरीही केली आहे.

सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे ती अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant massey) याची. विक्रांत सध्या 2 th Fail या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. मात्र, मिर्झापूर या वेबसीरिजमुळे तो खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचला. आज बॉलिवूडमधला गुणी आणि उत्तम अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. विक्रांतने सिनेमा, वेबसीरिजमध्ये काम करण्यापूर्वी तो बालिकावधू या गाजलेल्या मालिकेतही झळकला आहे. त्यामुळे आज तो लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. परंतु, लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या या अभिनेत्याने एकेकाळी बराच स्ट्रगल केला आहे.

घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तो सुरुवातीला वर्सोवामधील एका कॉफी शॉपमध्ये नोकरी करायचा. परंतु, त्याचं वय कमी असल्यामुळे बाल मजुरीचा आरोप लागू नये यासाठी त्याला खरं वय कोणालाही न सांगण्याचा सल्ला कॉफी शॉपच्या मालकाने दिला होता. या कॉफी शॉपमध्ये काम करायचे त्याला ८०० रुपये मिळायचे. या जॉब शिवाय तो डान्सदेखील शिकवायचा. 

वयाच्या १६ व्या वर्षी मिळाली मालिका

वयाच्या १६ व्या वर्षी विक्रांतला पहिली मालिका मिळाली. मात्र, काही कारणास्तव ही मालिका प्रसारित झाली नाही. या मालिकेसाठी त्याने डान्स क्लासची नोकरीही सोडली होती. पण, याच काळात त्याला नव्या मालिकेची ऑफर मिळाली. विक्रांत बाथरुमच्या रांगेत उभा असताना त्याला एकाने मालिक काम करणार का? असं विचारलं. त्याच्या होकारानंतर त्याला  'धूम मचाओ धूम' ही मालिका मिळाली. या मालिकेसाठी त्याला एका एपिसोडसाठी ६ हजार रुपये मानधन मिळत होतं.

दरम्यान, छोट्या पडद्यावर ६ वर्ष काम केल्यानंतर तो हिरो मटेरियल नाही असं म्हणत अनेकांनी त्याला काम देण्याचं टाळलं. परंतु, त्यानंतर त्याला लुटेरा हा सिनेमा मिळाला. या सिनेमानंतर त्याचा फिल्मी प्रवास सुरु झाला. छपाक, मिर्झापूर, कबूल है, बाबा ऐसा वर धुंडो, हाफ गर्लफ्रेंड, लिपस्टिक अंडर मया बुरखा,क्रिमिनल जस्टिस यांसारख्या अनेक मालिका, सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये तो झळकला. 

टॅग्स :विक्रांत मेसीबॉलिवूडवेबसीरिजसेलिब्रिटीटिव्ही कलाकार