Join us

बाप असावा तर असा! विक्रांतने लेकासाठी केलीय ही खास गोष्ट, सगळीकडून कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 09:20 IST

12th फेल फेम अभिनेता विक्रांत मेस्सीने नुकत्याच जन्मलेल्या त्याच्या बाळासाठी एक खास गोष्ट केलीय. त्यामुळे सगळीकडे त्याचं कौतुक होतंय

'12th फेल' सिनेमा गाजवून लोकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी. विक्रांतने 'मिर्झापूर', '12 फेल' अशा कलाकृतींमधून अभिनेता म्हणून स्वतःची बॉलिवूडमध्ये चांगलीच छाप पाडली आहे. विक्रांतच्या आयुष्यात काहीच दिवसांपुर्वी नवा पाहुणा आला. विक्रांत आणि त्याची पत्नी शीतल या दोघांना मुलगा झाला. आता मुलाच्या जन्मानंतर विक्रांतने एक खास गोष्ट केलीय, ज्यामुळे सगळीकडून त्याचं कौतुक होतंय. 

विक्रांतने सोशल मीडियावर  एक फोटो शेअर केलाय. यात त्याच्या हातावर टॅटू दिसत असून त्यावर त्याचा मुलगा वरदानचं नाव आणि जन्मतारीख दिसून येतेय. Addition or Addiction. I love them both असं कॅप्शन देत विक्रांतने हा खास फोटो शेअर केलाय. विक्रांतने लेकासाठी केलेल्या या खास गोष्टीमुळे सर्वत्र त्याचं कौतुक होतंय. 

विक्रांतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, २०२३ मध्ये विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12th फेल' सिनेमा विक्रांतने गाजवला. या सिनेमातील विक्रांतच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक झालं. आता विक्रांत लवकरच एकता कपूर निर्मित 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काहीच दिवसांपुर्वी या सिनेमाचा टिझर रिलीज झाला असून सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

टॅग्स :विक्रांत मेसीमिर्झापूर वेबसीरिज