Join us

"माझ्या भावाने १७ व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला तेव्हा...", विक्रांत मेस्सीने सांगितला 'तो' प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 1:42 PM

विक्रांतचे वडील ख्रिश्चन तर आई पंजाबी आहे. भावाने इस्लाम कबूल केल्यानंतर...

टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा '12th फेल' फेम अभिनेता विक्रांत मेस्सीचं (Vikrant Massey) सध्या सगळीकडूनच कौतुक होतंय. '12th फेल' सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला फिल्मफेअर क्रिटिक्स चॉईस उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. शिवाय प्रेक्षकांची मिळालेली दाद तर सगळ्यांनीच पाहिली. सिनेमाच्या यशानंतर विक्रांत अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. टीव्ही ते सिनेमा हा त्याचा प्रवास तो सांगत आहे. तसंच त्याचं बालपण, कुटुंब याबद्दलही त्याने दिलखुलास संवाद साधला आहे. विक्रांतचे वडील ख्रिश्चन, आई पंजाबी आहे. विशेष म्हणजे त्याच्या भावाने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. 

विक्रांत मेस्सीचं कुटुंब म्हणजे सर्वधर्मसमभावाचं उत्तम उदाहरण आहे. मेस्सी कुटुंब मूळचं शिमलाचं आहे. नंतर ते मुंबईत स्थायिक झाले. विक्रांतचे वडील आठवड्यातून दोन वेळा चर्चला जातात. तर त्याची आई पंजाबी आहे. विशेष म्हणडे विक्रांतच्या भावाने वयाच्या १७ व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला. त्याला आईवडिलांचा पूर्ण पाठिंबाही मिळाला. याविषयी बोलताना विक्रांत म्हणाला, "माझ्या भावाचं नाव मोईन आहे. आणि माझं विक्रांत. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असं कसं? त्याने वयाच्या १७ व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला. माझ्या कुटुंबाने त्याला अडवलं नाही. ज्यात तुम्हाला समाधान मिळतं ते करा हीच माझ्या आईवडिलांची शिकवण आहे."

तो पुढे म्हणाला, "मी लहानपणापासूनच धर्म आणि अध्यात्मावरुन होणारे मतभेद पाहिले आहेत. माझ्या वडिलांना नेहमी नातेवाईकांकडून हे प्रश्न आले की तुम्ही मोईनला धर्म बदल करण्यास कशी परवानगी दिली? तेव्हा माझे वडील म्हणायचे याच्याशी तुमचं काही देणंघेणं नाही. तो माझा मुलहा आहे त्यामुळे तो फक्त माझ्या प्रश्नांना उत्तरं देण्यास बांधिल आहे. त्याला मी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. घरात हे वातावरण पाहून मला असं वाटलं की हे धर्म वगरे आहे तरी काय? हे सगळं मानवनिर्मित आहे."

विक्रांत मेस्सी स्वत: हिंदू धर्माचं पालन करतो. शिवाय तो सर्व धर्माचा आदर करतो. तो नुकताच एका गोंडस मुलाचा बाबा झाला आहे. विक्रांतच्या पत्नीचं नाव शीतल ठाकूर आहे. ती देखील एक अभिनेत्री आहे. 

टॅग्स :विक्रांत मेसीबॉलिवूडटेलिव्हिजनअध्यात्मिक