Join us

सलमानच्या फिटनेसविषयी विंदू दारा सिंहचं बेधडक वक्तव्य; म्हणाला, 'तो डुकरासारखं खातो अन्..'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 12:05 PM

Vindu dara singh: विंदू दारा सिंह आणि सलमान खान हे कॉलेज मित्र आहेत. दोघांनीही एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं असून विंदू यांनी सलमानच्या फिटनेसविषयी भाष्य केलं.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) उत्तम अभिनयासह त्याच्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत येत असतो. वयाची ५० वर्ष क्रॉस केल्यानंतरही सलमानचा उत्साह आणि त्याचा फिटनेस एखाद्या पंचविशीच्या तरुणाला लाजवेल असाच आहे. त्यामुळेच तो कायम चर्चेत येत असतो. मात्र, नुकतंच अभिनेता विंदू दारा सिंह ( vindu dara singh) यांनी सलमानविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. सलमान एखाद्या डुकराप्रमाणे खातो आणि कुत्र्याप्रमाणे व्यायाम करतो, असं विधान विंदू दारा सिंह याने केलं आहे.

अलिकडेच विंदू दारा सिंह याने सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सलमानच्या फिटनेसविषयी भाष्य केलं आहे. सलमान आणि विंदू दारा सिंह यांनी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे कॉलेजच्या दिवसांमध्ये सलमान कसा होता हे त्याने सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाला विंदू दारा सिंह?

"सलमान कायम सांगायचा की, तो माझी शरीरयष्टी पाहून व्यायाम करु लागला. पण, मी त्याला कायम सांगायचो की तू प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करतोयेस. इतकंच नाही तर तो जेवतो सुद्धा जास्त. तो डुकराप्रमाणे खातो आणि श्वानासारखा व्यायाम करतो", असं विंदू दारा सिंह म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "तो जेवढं खातो ते पाहून जर आपण विचारलं की, भाई हे सगळं जेवण जातं कुठे? तर तो कायम उत्तर देतो जाळून टाकतो. आणि, खरोखरच तो संध्याकाळी व्यायामादरम्यान तो तेच करतो. सलमान अद्भूत आहे. तो कायम इतरांना मदत करायला पुढे असतो"

टॅग्स :बॉलिवूडसलमान खानसेलिब्रिटीसिनेमा