अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटाच्या कथेपासून कलाकारांच्या अभिनयापर्यंत सगळ्यांची चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाने जगभरात ६५० कोटींहून जास्त कमाई केली आहे. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुलाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्यांचा खास मित्र कवी कलश यांची भूमिका अभिनेता विनीत कुमार सिंग(Vineet Kumar Singh)ने साकारली आहे. या भूमिकेचंही खूप कौतुक झालं आहे. दरम्यान आता सिनेमात संभाजी महाराज यांच्यासोबत औरंगजेबने केलेल्या क्रूर वर्तणुकीवर आता विनीत कुमार सिंगने मौन सोडले आहे.
छावा चित्रपटाच्या रिलीज आणि यशामुळे काही लोकांनी असेही म्हटले की यात औरंगजेबची बदनामी करण्यात आली आहे आणि हिंसाचार खूप दाखवण्यात आला आहे. विनीत कुमार सिंगने दिलेल्या मुलाखतीत आरजे रौनक यांनी त्याला विचारले की, तुम्ही औरंगजेबाबद्दल योग्य ते वाचले आहे का? तुम्ही शिवाजी सावंत यांची कादंबरी वाचली आहे का? चित्रपटात दाखवलेल्या गोष्टींशी तुम्ही अजूनही सहमत आहात का? की नाही, असे चित्रपट समाजातील लोकांमध्ये फूट पाडतात असे तुम्हाला वाटते?
''मला चांगल्या कथांचा भाग व्हायचे आहे''
त्यावर विनीत कुमार सिंग म्हणाला की, 'विचारधारेच्या दृष्टीने हे दोनच पर्याय असावेत, असे नाही. मी एक कलाकार आहे. माझ्या टीममध्ये हेअर आणि मेकअप, माझा एक पर्सनल बॉय, ड्रायव्हर आणि मॅनेजर यांचा समावेश आहे. जेव्हा मी काम करत असतो तेव्हा प्रत्येकजण खूप व्यस्त असतो. माझ्याकडे अशी कोणतीही टीम नाही की आम्ही स्क्रिप्ट घेऊन त्यावर ५ वर्षे संशोधन करू. कारण या प्रक्रियेतून गेलो तर मला असे वाटते की मी माझ्या आयुष्यात ५ सिनेमे जरी केले तरी खूप मोठी गोष्ट आहे. मी नेहमी गृहीत धरतो की दिग्दर्शक आणि निर्मात्याने खूप गोष्टींचा विचार केला असावा. मी चांगले काम शोधत राहतो. एक कलाकार म्हणून मला चांगल्या कथांचा भाग व्हायचे आहे, चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करायचे आहे.
अशी केली भूमिकेची तयारी...
तो पुढे म्हणाले, 'मी स्वतः पाहतो की संपूर्ण विभाग या विषया संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात गुंतलेला आहे. बऱ्याच वेळा वर्षे निघून जातात आणि अनेक गोष्टींमध्ये निकाल मिळत नाही. मी एक कलाकार आहे, मी किती संशोधन करू शकेन? आता कथा आहे छावा, चित्रपट सुरू होण्यापूर्वी मी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश जी यांच्या समाधीच्या ठिकाणी गेलो होतो. मी तिथे वेळ घालवला आणि अर्धा दिवस राहिलो. मी बराच वेळ समाधीजवळ बसलो आहे. मी तिथल्या अनेक वृद्धांशी बोललो आणि त्यांनी मला अनेक किस्से सांगितले. आपण घडलेल्या क्रौर्याचा फक्त एक भाग पाहण्यास सक्षम आहात.
"इथेतर जखमा करून मीठ चोळले होते"विनीत कुमार सिंग पुढे म्हणाला, 'तुम्ही एक महिन्यापेक्षा जास्त काळ एखाद्याला तुम्ही टॉर्चर करत असाल, तर तुम्ही ते शूट करत असल्यास तुम्हाला कळेल की तुम्हाला काय पाहायला मिळेल? मी डॉक्टर आहे, मी पाहिले आहे की जेव्हा लोक जखमी झाल्यावर आपत्कालीन कक्षात येतात, तेव्हा आम्ही त्यांच्या जखमा स्वच्छ करण्यासाठी अँटीसेप्टिक लावतो तेव्हा लोक ओरडतात. त्यांना त्यांची आजी आठवते. त्यांना हात लावला आहे, तेव्हा त्यांचे ओरडणे ऐकले आहे. इथेतर जखमा करून मीठ चोळले होते, तुम्हाला कळतंय का? तुम्हाला खूप कथा ऐकायला मिळतील, लोकांना भेटू शकता आणि त्यांच्याशी बोलू शकता. एक अभिनेता म्हणून माझ्या क्षमतेत कोणतीही कमतरता राहू नये, असा आशीर्वाद घेण्यासाठी मी गेलो होतो. त्यानंतर मी प्रवास सुरू केला. तो पुढे म्हणाला, 'एक अभिनेता म्हणून मी स्क्रिप्ट फॉलो करतो, एकदा मी दिग्दर्शक, निर्मात्याला हो म्हटलं की मग मी त्यांना शरण जातो. आता जे काही लिहिले आहे त्या व्याप्तीत मला जे काही बदलावे लागेल ते मी करेन.