शार्क टँक इंडिया (Shark Tank India)मध्ये जजच्या भूमिकेत असणाऱ्या विनिता सिंग(VineetaSingh)ने एक व्हायरल मीम पुन्हा रिक्रिएट केला आहे. खरे तर विनिता सिंगला ट्रोलर्सना कसे उत्तर द्यायचे हे चांगलेच माहित आहे. तिची तुलना थ्री इडियट्स चित्रपटात राजू रस्तोगीच्या आईशी करण्यात आली आहे. चित्रपटात शर्मन जोशीने राजू रस्तोगीची भूमिका साकारली होती आणि तिच्या आईची भूमिका अमरदीप झा यांनी साकारली होती. हा चित्रपट २००९ मध्ये आला होता, जिथे भाज्यांचे भाव वाढले तेव्हा ती त्यांची सोन्याशी तुलना करताना दिसली होती.
आता अनेकांना राजू रस्तोगीची आई आणि विनिता सिंग यांच्यात साम्य आढळून आले आहे. त्यामुळे तिचे मीम्स व्हायरल झाले होते. आता एका मजेशीर व्हिडीओमध्ये त्यांच्या ऑफिसचा एक कर्मचारी विनिता सिंगवर बनवलेला एक व्हायरल मीम पाहतो आणि विनिता सिंग यांच्या केबिनमध्ये बजेट मंजुरीसाठी जातो. त्यावेळी विनिता सिंग राजू रस्तोगीच्या आईच्या ड्रेसमध्ये दिसली आणि म्हणते, 'झाडावर पैसे उगतात काय, तुम्हाला माहिती आहे भेंडी १२ रुपये झाली आहे आणि पनीर सोन्याच्या भावाने विकले जात आहेत.' यानंतर कर्मचारी पुन्हा बजेटच्या मंजुरीबाबत विचारतो. तर ती म्हणते, 'इतकी महागाई वाढली आहे,आणि तुमच्या इतक्या मोठ्या मोठ्या मागण्या, मग आम्ही काय खाणार'. यानंतर कर्मचारी निघून जातो.
विनिता सिंगनंतर आपल्या कर्मचारीकडे जाते आणि म्हणते की, ऑल इज वेल. यासोबतच ती म्हणते की, ऑल इज नॉट वेल, स्टॉप विथ फोटो शॉपिंग. विनिता सिंगचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होतो आहे. एका चाहत्याने लिहिले की, खूप छान, क्रिएटिव्ह आर्ट आणि एडिटिंग. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, असाप्रकारे तुम्ही ट्रोलर्सला उत्तर देता, हे खूप मजेशीर आणि क्रिएटिव्ह आहे.