आपल्या अभिनयाने विनोद खन्ना यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. त्यांनी १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, मुकद्दर का सिंकदर, गद्दार, जेल यात्रा, इम्तिहान, इन्कार, अमर अकबर अँन्थनी, राजपूत, कुरबानी, कुदरत, दयावान, कारनामा, सुर्या, जुर्म या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.१९९९मध्ये विनोद खन्ना यांना बॉलीवूडमधील त्यांच्या योगदानाबद्दल फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड देण्यात आला होता. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
विनोद खन्ना यांचे 27 एप्रिल 2017 रोजी वयाच्या 71 व्या वर्षी ब्लॅडर कॅन्सरने निधन झाले होते.या आजारपणामुळे त्यांचे वजन कमी झाल्याने त्यांना ओळखणेदेखील कठीण झाले होते. त्यांचा रुग्णालयात असतानाचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि हा फोटो पाहून त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना धक्का बसला होता.नेकवेळा उपाचारासाठी जर्मनीला देखील जाऊन आले होते.
तिथे त्यांच्यावर सर्जरी देखील झाली होती. पण अखेरीस या आजारावर त्यांना मात करता आली नाही. त्यांना कॅन्सर झाला हे ज्यावेळी त्यांना कळले, त्यावेळी त्यांच्या मुलीची महत्त्वाची परीक्षा सुरू होती आणि त्यांच्या मुलीला पालकांची नितांत गरज होती. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. त्यांनी काही काळानंतर या गोष्टीबद्दल त्यांच्या बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील जवळच्या व्यक्तींना सांगितले होते.
यशाच्या शिखरावर असताना अचानक १९८२मध्ये विनोद खन्ना यांनी सिनेसृष्टीतून तात्पुरते बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय़ सिनेसृष्टीसाठी धक्कादायकत होतो. या काळात ते आध्यात्मिक गुरु रजनीश ओशो यांच्या आश्रमात गेले. येथे त्यांनी माळीचे कामही केले. ओशोंशी प्रभावित होऊन त्यांनी आपले वैवाहिक आयुष्य उध्वस्त केले होते. विनोद खन्ना पुण्यात ओशो यांच्या आश्रमात जात होते.
इतकेच नव्हे तर ते त्यांच्या चित्रपटांचे शूटिंगदेखील पुण्यातच ठेवायचे. पुण्याच्या ओशो आश्रमात त्यांनी 31 डिसेंबर 1975 रोजी दीक्षा घेतली होती. त्यानंतर विनोद खन्ना यांनी चित्रपटांपासून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.