Join us

'फायटर'मधील 'शेर खुल गये' ची क्रेझ; एअरपोर्टवर हुकस्टेप करताना दिसली दीपिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 5:07 PM

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडचं लोकप्रिय 'पॉवर कपल' आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा 'फायटर' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.  या सिनेमातील 'शेर खुल गए' (Sher Khul Gaye) हे पहिलं गाणं आऊट झालं आहे. या गाण्याची क्रेझ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. नुकतेच दीपिका या गाण्याच्या हुकस्टेप करताना दिसली. तिचा हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडचं लोकप्रिय 'पॉवर कपल' आहे. दीपिका आणि रणवीरची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. नुकतेच दोघेही व्हॅकेशनवरुन मुंबईत परतले. यावेळी एअरपोर्टवर कारमध्ये बसल्यावर एका पापराझीने त्यांना 'शेर खुल गए'  गाण्यावर हुकस्टेप करुन दाखवल्या. यावर दीपिकाने आपलं डान्स स्किल दाखवलं.  तर रणवीर सिंगनेही पत्नीसोबत हुकस्टेप केल्या. त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. 

दीपिका तिच्या एअरपोर्ट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळीही ती स्टायलिश लूकमध्ये दिसली. तिने हाफ स्वेटर, पांढऱ्या शर्टसह मॅचिंग पॅन्ट घातली होती. तर गॉगलने आणखी दमदार लूक दिला.  तर, रणवीर काळ्या रंगाच्या स्वेटशर्ट, डेनिम पॅंट, गॉगल, स्नीकर्स आणि कॅपमध्ये देखणा दिसत होता. 

'फाइटर'  हा सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, करण सिंग ग्रोव्हर आणि अनिल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर रणवीर सिंगबद्दल बोलायचे झाले तर तो 'सिंघम 3', 'सिम्बा 2', 'डॉन 3' आणि 'बैजू बावरा' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सिंघम 3' यावर्षी 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे. यात अजय देवगण, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार आणि करीना कपूर खान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

टॅग्स :दीपिका पादुकोणसेलिब्रिटीबॉलिवूडरणवीर सिंग