व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशने बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ होतोय व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 10:45 AM
व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशने काहीही केले तरी ते सोशल मीडियावर वाºयासारखे व्हायरल होते. आता तिचा आणखी एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश सध्या लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर आहे. आपल्या डोळ्यांच्या एक्सप्रेशनमुळे रातोरात इंटरनेट सेनसेशन बनलेल्या प्रियाचा आजही सोशल मीडियावरही प्रभाव कायम आहे. त्यामुळेच तिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी अनेक निर्माते रांगेत उभे आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत तिला अनेक जाहिराती मिळाल्या असून, त्यातूनही तिची लोकप्रियता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. खरं तर तिने काहीही केले तरी, सोशल मीडियावर त्याची चांगली अथवा वाईट चर्चा रंगते. अशातच तिचा एक व्हिडीओ समोर आला असून, तोदेखील तिच्या इतर व्हिडीओप्रमाणे सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. नुकतीच प्रिया एका रिसेप्शन पार्टीत पोहोचली होती. याठिकाणी तिने संजय दत्तच्या एका चित्रपटातील गाण्यावर असा काही ठेका धरला की, बघणारे दंग राहिले. प्रियाला हिंदी गाणे गाताना बघणे तिच्या नॉर्थ इंडियन चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटप्रमाणे होते. प्रियाने संजय दत्त आणि शत्रुघ्न सिन्हा स्टारर ‘इंसाफ अपने लहू से’ या चित्रपटातील ‘हवा हवा खुशबू लुटा दे’ या सुपरहिट गाण्यावर जोरदार डान्स केला. अर्जुन कपूरच्या ‘मुबारकां’ या चित्रपटातही या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन दाखविण्यात आले होते. मात्र प्रियाने ओरिजनल गाण्यावर थिरकताना ते गायलेही. ज्यास हसन जहांगीर यांनी आपला आवाज दिला आहे. प्रिया प्रकाश ज्या पार्टीत गेली होती, त्याठिकाणी ‘ओरू अदार लव’ या तिच्या डेब्यू चित्रपटाची संपूर्ण कास्ट उपस्थित होती. यावेळी तिने चित्रपटातील तिचा हीरो रोशन अब्दुल रहूफ याच्यासोबत काही फोटो काढून ते इन्स्टाग्रामवर शेअरही केले. यूजर्स तिच्या या फोटोचे चांगलेच कौतुक करीत आहेत. एका यूजर्सने तर या दोघांना लग्न करण्याचा सल्लाही दिला. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रिया प्रकाशला व्हायरल पर्सनॅलिटी आॅफ द ईयर या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी प्रियाने हा अवॉर्ड आपल्या ‘ओरू अदार लव’ची संपूर्ण टीम आणि दिग्दर्शक ओमर लुलु यांना समर्पित केला. यावेळी प्रियाने अवॉर्ड घेतानाचा तिचा एक फोटोही पोस्ट केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, अवॉर्ड मिळाल्याचा आनंद होत आहे. त्याचबरोबर स्वत:वर गर्वही वाटत आहे.