Join us

हिंदी भाषेवरुन व्हायरल 'थप्पड' सीन, प्रकाश राज यांनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2021 6:42 PM

'जय भीम'सारखा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना आदिवासींच्या व्यथा दिसल्या नाहीत, अन्यायाची भीती दिसली नाही, त्यांना फक्त कानशिलात दिसली. एवढेच त्यांना समजले, यातून त्यांचा अजेंडा उघड होतो. काही गोष्टींचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे, असेही प्रकाश राज यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देअभिनेता प्रकाश राज आणि सूर्या यांची स्टारकास्ट असलेला जय भीम चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. सध्या हा चित्रपट सोशल मीडियासह माध्यमांत चांगलाच चर्चेत आहे

हैदराबाद - दाक्षिणात्य अभिनेता आणि बॉलिवूडचा जयकांत शिक्रे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ट्विटरवर अभिनेता प्रकाश राज ट्रेंड करत असून त्यांच्या जयभीम चित्रपटातील एका सीनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, हिंदीत संवाद साधल्यामुळे एका तमिळ व्यकीच्या ते कानशिलात वाजवतात. त्यांच्या या सीनवरुन अनेकजण त्यांच्यावर नाराज झाले आहेत. तर, अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केलीय. आता, याबाबत प्रकाश राज यांनी स्पष्टीकरण दिलंय. 

'जय भीम'सारखा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना आदिवासींच्या व्यथा दिसल्या नाहीत, अन्यायाची भीती दिसली नाही, त्यांना फक्त कानशिलात दिसली. एवढेच त्यांना समजले, यातून त्यांचा अजेंडा उघड होतो. काही गोष्टींचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे, असेही प्रकाश राज यांनी म्हटलं आहे. तसेच, त्या सीनबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तमिळ भाषिक व्यक्ती जो आरोपी आहे, स्थानिक भाषा जाणणारी ही व्यक्ती प्रश्नांपासून दूर राहण्यासाठी हिंदीत बोलणे निवडते, हे माहित असल्यानेच एका पोलीस तपास अधिकाऱ्याने ही कानशिलात लगावली, अशावेळी तो काय करेल? असा प्रतिप्रश्नच राज यांनी न्यूज 9 लाईव्हशी बोलताना विचारला. तसेच, अशा वादांवर स्पष्टीकरण देण्यात अर्थ नाही, असेही त्यांनी म्हटले.    अनेकांना या सीनमधील थप्पड दिसली, कारण तिथे प्रकाश राज होता. त्यातून, माझ्यापेक्षा त्यांची नग्नता दिसून येते, कारण त्यांचा हेतू उघड झाला. त्यामुळे, त्या व्यक्तींबद्दल प्रतिक्रिया देणे मला महत्त्वाचे वाटत नाही, असेही राज यांनी म्हटलंय.

अभिनेता प्रकाश राज आणि सूर्या यांची स्टारकास्ट असलेला जय भीम चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. सध्या हा चित्रपट सोशल मीडियासह माध्यमांत चांगलाच चर्चेत आहे. टीएस. गगानवेल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आदिवासी लोकांवर होणाऱ्या अन्यायाची कथा या चित्रपटातून साकारण्यात आली आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून तमिळ भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातील एका सीनवर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्यामध्ये, अभिनेता प्रकाश राज हे एका व्यक्तीच्या कानशिलात लगावतात. त्यावेळी, मला का मारले, अशी विचारणा संबंधित व्यक्तीकडून करण्यात येते. त्यावर, बोलताना तू हिंदीत का बोललास, तमिळ भाषेत बोल म्हणून प्रकाश राज यांच्या भूमिकेतील पोलीस अधिकाऱ्याकडून सज्जड दमच दिला जातो. सध्या हा सीन चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, प्रकाश राज हे नेहमीच आपला प्रोफोगांडा चालवतात, ते आपल्या विचासरणीला चित्रपटांच्या माध्यमातून प्रदर्शित करतात, असा आरोप करत अनेकांनी प्रकाश राज यांना ट्रोल केलंय. ट्विटरवर त्यांच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

टॅग्स :प्रकाश राजबॉलिवूड