लॉकडाऊन खुले तो...! ‘मिर्झापूर’च्या पंडितजींवर का आली रस्त्यावर ‘रामलड्डू’ विकण्याची वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 11:48 AM2021-05-28T11:48:42+5:302021-05-28T11:51:47+5:30

Mirzapur : रमाकांत पंडितजी अर्थात अभिनेता राजेश तैलंग. सध्या राजेशचा एक फोटो चर्चेचा विषय बनला आहे. 

viral on social media mirzapur actor rajesh tailang shared photo of lockdown effect as he sales ram ladoo | लॉकडाऊन खुले तो...! ‘मिर्झापूर’च्या पंडितजींवर का आली रस्त्यावर ‘रामलड्डू’ विकण्याची वेळ?

लॉकडाऊन खुले तो...! ‘मिर्झापूर’च्या पंडितजींवर का आली रस्त्यावर ‘रामलड्डू’ विकण्याची वेळ?

googlenewsNext
ठळक मुद्देराजेश तैलंग यांना ‘मिर्झापूर’ सीरिजने ख-या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली.

‘मिर्झापूर’ ( Mirzapur) ही वेबसीरिज पाहिली असेल तर पंडितजी कोण हे तुम्हाला माहित असणारच. होय, वेबसीरिजमध्ये अली फजल म्हणजे गुड्डू भैय्याच्या वडिलांची भूमिका साकारणारे तेच रमाकांत पंडितजी. अर्थात अभिनेता राजेश तैलंग (Rajesh Tailang). सध्या राजेशचा एक फोटो चर्चेचा विषय बनला आहे. यात तो रस्त्यावर ‘रामलड्डू’ विकताना दिसतोय. आता पंडितजींवर रामलड्डू विकण्याची वेळ आल्यावर चाहत्यांची चिंता वाढणारच. (Rajesh Tailang Viral Photo)
राजेश तैलंग यांनी स्वत:च हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यात रस्त्यावर स्टँड लावून तो रामलड्डू विकताना दिसतोय. ‘लॉकडाऊन खुले, कोरोना जाए तो फिर धंदे पे लगे,’ असे कॅप्शन हा फोटो शेअर करताना त्याने दिले आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे आणि यामुळे सर्व व्यवहार ठप्प पडला आहे. चित्रपट, मालिकांचे शूटींग बंद आहे. अशात छोट्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर राजेश तैलंग यांनी ही पोस्ट केल्याचे दिसते.
राजेश तैलंग यांच्या या फोटोवर सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. काहींच्या मते, हा एखाद्या शूटींगचा फोटो असावा तर काहींनी या फोटोचा संबंध राजेश यांच्या आर्थिक स्थितीशी जोडला आहे.

 ‘वकालत से सीधे इस धंदे में घुस गए गुरू?’ अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने यावर दिली आहे. बस कर पगले, अब रूलाएगा क्या, अशी मजेदार प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. 1 प्लेट कितनी की भैय्या, असा सवाल एका युजरने केला आहे. अभी स्टोर कर के रखी लीजिये..., लॉकडाऊन खुलने पर ब्लॅक मे बेचना, असा अजब सल्ला एका युजरने त्यांना दिला आहे.


राजेश तैलंग यांना ‘मिर्झापूर’ सीरिजने ख-या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. खरे तर वयाच्या 13 व्या वर्षापासूनच राजेश अभिनय करत आहेत. 13 वर्षाच्या वयात ‘ढाई अक्षर’ या मालिकेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. यानंतर एनएसडीमधून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. अनेक चित्रपट व मालिकांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांनी मने जिंकलीत.

Web Title: viral on social media mirzapur actor rajesh tailang shared photo of lockdown effect as he sales ram ladoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.