बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या लग्नाच्या सोशल मीडियावर दररोज असंख्य चर्चा रंगत असतात. वयाची ५० पार केल्यानंतरही सलमानने अद्यापही लग्न का केलं नाही या मागचं कारण जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. या लग्नाच्याच चर्चांमध्ये त्याच्या अफेअरच्याही जोरदार चर्चा होता. आतापर्यंत सलमानचं नाव अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत जोडलं गेलेलं आहे. मात्र, यावेळी सलमानच्या लग्नाची किंवा अफेअरची चर्चा रंगली नसून चक्क त्याच्या साखरपुड्याची चर्चा होत आहे. सलमानने गुपचूप पद्धतीने एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत साखरपुडा केल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर त्यांचा एक फोटोही व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर सलमानचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो चक्क साखरपुडा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे लुलिया वंतूरसोबत अफेअरच्या चर्चा सुरु असताना सलमान लुलियाऐवजी अन्य एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत एंगेजमेंट करताना दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या एकाच चर्चेला उधाण येत आहे.
सलमान खानचा मोठा निर्णय; मृत्यूनंतर संपत्ती करणार 'यांच्या' नावे
कोणासोबत केला सलमानने साखरपुडा?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सलमान त्याची दबंग चित्रपटातील सहकलाकार सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिच्यासोबत साखरपुडा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सोनाक्षीदेखील कलाविश्वातील एका व्यक्तीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, तिनेदेखील त्या व्यक्तीला सोडून सलमानसोबत साखरपुडा कसा काय केला? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
काय आहे व्हायरल फोटोमागील सत्य?
सध्या चर्चेत आलेला फोटो फेक आहे. सलमान आणि सोनाक्षीने कोणत्याही प्रकारचा साखरपुडा वा लग्न केलेलं नाही. तर, हा फोटो फोटोशॉपच्या मदतीने एडिट करण्यात आला आहे. त्यामुळे या फोटोमध्ये कोणत्याही प्रकारची सत्यता नाही.
सलमान- सोनाक्षी चांगले मित्र
सोनाक्षी आणि सलमान यांच्यात गेल्या कित्येक वर्षांपासून चांगली मैत्री आहे. सोनाक्षीने सलमानच्या दबंग चित्रपटातून २०१० मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.