कधी काळी बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री राहिलेल्या जूही चावलाने १९८४ मध्ये मिस यूनिव्हर्स कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला होता आणि आता या इव्हेंटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जूही चावला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर लोकांना अभिवादन, नमस्कार करताना दिसत आहे.
या व्हिडीओत जूही चावला भारतीय सौंदर्याची प्रतीक वाटते आहे. डोक्यावर बिंदीया, नथ आणि गुलाबी लेहंगा तिने परिधान केलेला आहे. ती यावेळी कॉस्ट्यूम राऊंड अटेंड करायला आली होती. स्टेजवर पोहोचताच ती स्माइल करत म्हणते की, 'नमस्ते, मी जूही चावला, बॉम्बे इंडियातून'. या मिस यूनिव्हर्स स्पर्धेत जूहीला बेस्ट नॅशनल कॉस्च्यूम या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
१९८४ मध्ये जूही चावलाला मिस इंडिया हा किताब मिळाला होता. या स्पर्धेचा ताज बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी आपल्या हाताने तिला दिला होता.त्यानंतरच जूही चर्चे आली होती. १९८६ मध्ये तिने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात केली. तिच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं 'सल्तनत'. पण तिला खरी ओळख मिळाली ती १९८८ मध्ये आलेल्या 'कयामत से कयामत तक' सिनेमातून. यात तिला हिरो आमीर खान होता. त्यानंतर ती' स्वर्ग', 'प्रतिबंध', 'हम है राही प्यार के' 'डर'सारख्या सुपरहिट सिनेमात दिसली. यासोबतच जूही चावला ही एक ट्रेन्ड क्लासिकल सिंगरही आहे.
समीरा रेड्डी म्हणाली - बॉलिवूडमधून मला 'सावळी' आणि 'उंच' म्हणून रिजेक्ट केलं जायचं!
सनी लिओनीने शेअर केले फॅन्ससोबत ग्लॅमरस फोटो, See pics
PHOTOS: नाकात नथ आणि लाल रंगाच्या बनारसी साडीत मलायका अरोरा दिसली लय भारी!