Join us

​विराट कोहली व अनुष्का शर्माच्या चाहत्यांना बसू शकतो धक्का! आता १२ डिसेंबरला नाही होणार विरूष्काचे लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 9:03 AM

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाची चर्चा जोरात असताना या लग्नाबद्दल ताजे अपडेट्स  समोर आले आहेत. होय, अनुष्का व ...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाची चर्चा जोरात असताना या लग्नाबद्दल ताजे अपडेट्स  समोर आले आहेत. होय, अनुष्का व विराट उद्या १२ डिसेंबरला इटलीत लग्न करणार, असे मानले जात असताना आता लग्नाच्या तारखेबद्दल नवे अपडेट्स आहेत. विरूष्का आपआपल्या कुटुंबासोबत इटलीत पोहोचले आहेत. अतिशय जवळचे मित्र व कुटुंबीयांच्या उपस्थित होणाºया या लग्नात आमिर खान व शाहरूख खान पोहोचण्याचीही अपेक्षा आहे.  पण ताजे अपडेट्स खरे मानाल तर, हे लग्न १२ डिसेंबरला नाही तर १५ डिसेंबरला होणार आहे. अनुष्काच्या कुटुंबाच्या पंडितजींकडून हे संकेत मिळत आहेत. ताज्या माहितीनुसार, शर्मा कुटुंबाचे पंडित १२ ला नाही तर १५ डिसेंबरला इटलीहून परतणार आहेत. त्यामुळे अनुष्का व विराटचे लग्न १२ तारखेला नाही तर १५ ला होईल, असा तर्क बांधला जात आहे. या लग्नासाठी विरूष्काने बॉलिवूडच्या अगदी मोजक्या लोकांना निमंत्रण दिले आहे. क्रिकेट विश्वातीलही अगदी चार-दोन लोकांना त्यांनी निमंत्रित केले आहे. यात सचिन तेंडूलकर आणि युवराज सिंग यांचा समावेश आहे. भारतीय टीमला या लग्नाचे निमंत्रण नाही. अर्थात यामागेही एक कारण आहे. टीम इंडिया श्रीलंका सीरिजमध्ये बिझी असल्यामुळे विराटने टीमच्या सदस्यांना निमंत्रित केलेले नाही. विराटचे बालपणीचे मित्र आणि काही कुटुंबीय एवढे मात्र या लग्नाला आवर्जुन हजर राहणार आहे. सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर, चार पाच महिन्यांपासून या लग्नाची तयारी होती. दोन्ही कुटुंबांनी एकत्र येत लग्नाचे सगळे नियोजन केले.ALSO READ :​इटलीतील ‘या’ शानदार व्हिलामध्ये होणार अनुष्का -विराटचा शाही विवाह सोहळा?भारतात परतल्यानंतर २१ वा २२ तारखेला विराट व अनुष्काच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन असल्याचे कळतेय. मुंबईत हे रिसेप्शन होईल. यात बॉलिवूड व क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज हजर असतील. अर्थात टीम इंडिया २४ डिसेंबरला श्रीलंका सीरिजमधील शेवटचा डाव खेळणार असल्याने कदाचित विरूष्काच्या रिसेप्शनची तारीख पुढे ढकलली जाईल, याचीही शक्यता आहे. १२ जानेवारी २०१८ रोजी विरूष्का आपल्या लग्नाची कायदेशीर नोंदणी करतील, अशीही खबर आहे.