Join us

Anushka & Virat : अनुष्कासोबत विराट न्यूयॉर्कमध्ये घालवतोय ‘क्वालिटी’ टाइम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 12:01 IST

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा न्यूयॉर्कमधील एक फोटो समोर आला आहे.

 बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka  Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची जोडी ही फार लोकप्रिय आहे. ते दोघं अनेकांसाठी आयडियल कपल आहेत. नेकदा चाहते त्यांना परफेक्ट कपलही म्हणतात. दोघेही सोशल मीडियावर(Social Media) खूप सक्रिय असतात आणि एकमेकांसोबत फोटो शेअर करताना दिसतात.  सध्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहली न्यूयॉर्कमध्ये क्वालिटी टाइम घालवत आहेत.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा न्यूयॉर्कमधील एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे एका गार्डनमध्ये बसलेले दिसून येत आहेत.  फोटो पाहून असे म्हणता येईल की अनुष्का आणि विराट दोघेही सगळ्यांपासून दूर वेळ घालवत आहे. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निळ्या रंगाचे डेनिम जॅकेट, ब्लॅक टी-शर्ट आणि बेज जीन्स घातलेला विराट कोहली त्याची लेडी लक अनुष्का शर्माकडे पाहताना दिसून येत आहे. तर अनुष्का ही पांढरा टी-शर्ट आणि काळ्या जीन्समध्ये पाहायला मिळाली. 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना आपलं आयुष्य खाजगी ठेवायला आवडतं. विशेष प्रसंग वगळता दोघेही  वैयक्तिक आयुष्यातील झलक सोशल मीडियावर शेअर करत नाहीत. अनुष्का शर्मा गेल्या काही काळापासून लाइमलाइटपासून दूर आहे. काही दिवसांपुर्वीच या जोडीला मुलगा झाला आहे. अनुष्काची प्रसुतीदेखील  लंडनमध्ये झाली. त्यांनी आपल्या लाडक्या लेकाचं नाव 'अकाय' असं ठेवलं आहे. विराट अनुष्काला 'वामिका' ही मुलगीदेखील आहे. विराट-अनुष्का कॅमेऱ्यापासून त्यांच्या मुलांना दूर ठेवणं पसंत करतात. त्यांनी अद्याप 'अकाय' आणि 'वामिका'चा चेहरा मीडियाला दाखवलेला नाही. 

अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची 'झिरो' चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसली होती. गेल्या वर्षी तिनं 'काला'मध्ये छोटी भूमिका साकारली होती. अनुष्का लवकरच 'चकदा एक्सप्रेस'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची घोषणा काही वर्षांपूर्वीच झाली असून शूटिंगही पूर्ण झालं आहे. मात्र अद्याप सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही.

टॅग्स :अनुष्का शर्मासेलिब्रिटीबॉलिवूडविराट कोहली