Join us  

Virat Kohli - Anushka : अनुष्का-विराटच्या लाडक्या लेकाची पहिली झलक; लंडनमधील व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 6:15 PM

लंडनमधील एक व्हिडीओ समोर आला असून त्यात विरुष्काचा लाडक्या लेकाचा फर्स्ट लूक पाहायला मिळतोय. 

भारताचा क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli ) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. अनुष्काने एका गोंडस मुलाला जन्म दिला. 'अकाय' (Akaay) असं बाळाचं नाव ठेवण्यात आलं. 'अकाय'चा जन्म झाल्यापासून त्याला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. आता अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. लंडनमधील एक व्हिडीओ समोर आला असून त्यात विरुष्काचा लाडक्या लेकाचा फर्स्ट लूक पाहायला मिळतोय. 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लंडनमध्ये मुलगा 'अकाय' सोबत स्पॉट झाले आहेत. विराट-अनुष्काचा  'अकाय'सोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये विराटने 'अकाय' ला कडेवर घेतलेलं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये 'अकाय' ची झलक पाहायला मिळतेय. पण, त्याचा चेहरा दिसून येत नाहीये. तरीही पुसटशी झलक पाहायला मिळाल्याने चाहते मात्र भलतेच खूश झाले आहेत. 'अकाय'च्या जन्मापासूनच त्याला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून अनुष्का लंडनमध्येच वास्तव्यास आहे. गेल्या डिसेंबर महिन्यातच मुलगी वामिकासोबत अनुष्का लंडनमध्ये शिफ्ट झाली, तेव्हापासून ती तिथेच राहत आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अनुष्काने बाळाला जन्म दिला. अनुष्काला लंडनमध्ये राहून जवळपास 7 महिने उलटून गेले आहेत.अनुष्का आणि विराट हे दोघेही जण पहिल्यापासून खाजगी आयुष्य जगणं पसंत करतात. त्यांची लेक वामिकाच्या जन्माला चार वर्ष उलटले तरी तिची एक झलकही आजवर दाखवलेली नाही. त्यामुळेच आपलं खाजगी जीवन जगण्यासाठी या जोडप्यानं कायमचं लंडनमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीसेलिब्रिटीबॉलिवूड