Join us  

लंडनला स्थायिक होण्याच्या चर्चांदरम्यान विराट-अनुष्काचा फोटो व्हायरल, चाहत्यांच्या प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 12:55 PM

विराट अनुष्काबद्दल काहीही अपडेट आलं तरी ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Shamra) अनेक दिवसांपासून लंडनमध्येच आहे. आपल्या दोन्ही मुलांना साधं आयुष्य देण्यासाठी ती कुटुंबासोबत तिथेच शिफ्ट झाल्याचीही चर्चा आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहलीही (Virat Kohli)  कुटुंबाकडे लंडनला रवाना झाला. मुलांसोबत लंडनमध्ये फिरतानाचे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता नुकताच दोघांचा एकत्रित फोटो समोर आला आहे.

विराट अनुष्काबद्दल काहीही अपडेट आलं तरी ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं. काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना एका व्हिडिओत अकायचीही झलक दिसली. फुलांच्या दुकानाबाहेर अकाय विराटच्या कडेवर होता. तर बाजूला वामिका आणि अनुष्का उभ्या होत्या. आता नुकतंच विराट-अनुष्काचा पोज देतानाचा फोटो व्हायरल होतो. अनुष्काने स्ट्रॅप शोल्डर प्रिंटेड ड्रेस घातला आहे. शॉर्ट हेअरकट लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे. तर विराट कोहली व्हाईट टीशर्ट आणि शॉर्ट्स अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. त्यांचा हा लंडनमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. विराट तर म्हातारा दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. तसंच अनुष्काही अगदीच बारीक दिसत असल्याचं चाहत्यांच्या लक्षात आलं. विराट अनुष्का लंडनमध्येच शिफ्ट होणार का यावर दोघांकडूनही अद्याप काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. तसंच निवृत्तीनंतर मी बरेट दिवस तुम्हाला कोणालाच दिसणार नाही, गायब होईन असंही वक्तव्य विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच केलं होतं. यावरुन त्यांच्या लंडनला स्थायिक होण्याच्या चर्चांना उधाण आलं. महत्वाचं म्हणजे त्यांचा मुलगा अकायचा जन्मही फेब्रुवारी महिन्यात लंडनमध्येच झाला.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीलंडनव्हायरल फोटोज्सोशल मीडिया