Join us

शतक ठोकताच विराटने अनुष्का शर्माला दिली फ्लाइंग किस, तुम्ही पाहिला का हा Video?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 15:53 IST

विराटच्या या स्टाइलवर अनुष्काचे हावभावही पाहण्यासारखे होते.

Virat Kohli Flying Kiss To Anushka Sharma  : पर्थच्या मैदानात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत (Border Gavaskar Trophy Ind Vs Aus 1st Test) विराट कोहलीला अखेर सूर गवसला आहे. त्याने पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी शतक (Virat Kohli Century) झळकावलं आहे. विराटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 30 वं तर 81 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं आहे. कोहलीनं 21 जूलै  2023 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध अखेरचं कसोटी शतक झळकावले होते. त्यानंतर आता त्याच्या भात्यातून शतक पाहायला मिळाले आहे. शतक ठोकताच विराटने अर्धागिनी बॉलिवूड सुपरस्टार अनुष्का शर्माला फ्लाइंग किस दिली.

विराटच्या विक्रमानंतर अनुष्का शर्मा पतीला स्टँडवरून चिअर करताना दिसून आली. यावेळी विराटने अनुष्काला सगळ्यांसमोर फ्लाइंग किस दिली. हे खास क्षण कॅमेरात टिपण्यात आले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  हे फोटो आणि व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज येईल की विराट त्याच्या लेडी लव्हला स्पेशल वाटावे यासाठी कोणतीच संधी सोडत नाही. विराट कोहलीने याआधीही अनेकदा आपले प्रेम जाहीरपणे व्यक्त केले आहे.

विराटच्या या स्टाइलवर अनुष्काचे हावभावही पाहण्यासारखे होते. फ्लाइंग किस मिळताच अनुष्का लाल झाली. तिच्या चेहऱ्यावरील हास्यातूनही तिचे विराटबद्दलचे प्रेम स्पष्ट दिसत आहे. या व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, अनुष्का उत्साहाने स्टेडियममध्ये पती विराट कोहलीला सपोर्ट करत आहे. अनुष्का कायम विराटला पाठिंबा देताना दिसून येते. तर विराटही तिला आपलं लेडी लक मानतो.  

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीभारतआॅस्ट्रेलिया