Join us  

वर्ल्डकप विजय यात्रेनंतर अनुष्काला भेटायला लंडनला गेला किंग कोहली, एअरपोर्टवरील व्हिडिओ समोर, नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 10:13 AM

टी २० वर्ल्ड कपचा विजय पत्नी अनुष्का शर्माबरोबर सेलिब्रेट करण्यासाठी विराट लंडनला गेला आहे. त्याचा एअरपोर्टवरील व्हिडिओ समोर आला आहे.

T20 World Cup Virat Kohli: टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम गुरुवारी(४ जून) मायदेशी परतली. टीम इंडियाची विजय यात्रा पाहण्यासाठी मरीन ड्राइव्हवर क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. वानखेडेवर टीम इंडियाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. तर, टीम इंडियाचं चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केलं. सेलिब्रेशननंतर मात्र विराट कोहली लगेचच लंडनला जाण्यासाठी एअरपोर्ट गेलेला पाहायला मिळाला. 

टी २० वर्ल्ड कपचा विजय पत्नी अनुष्का शर्माबरोबर सेलिब्रेट करण्यासाठी विराट लंडनला गेला आहे. त्याचा एअरपोर्टवरील व्हिडिओ समोर आला आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन विराटचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत किंग कोहलीचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे. अनुष्का आणि कुटुंबीयांबरोबर हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी विराट लंडनला गेला आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 

"किंग फायनली घरी चालला आहे", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "कोहली वेस्ट इंडिजवरुन परतला. नंतप दिल्लीत मोदींना भेटला. मुंबईला आला आता तो फॅमिलीला भेटण्यासाठी लंडनला चालला आहे. थोडा आराम केला असतास", असं म्हटलं आहे. "विराट तू थकत नाहीस का?" अशी कमेंटही केली आहे. 

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराटने स्टेडियममधून अनुष्काला व्हिडिओ कॉल करत आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर विजय यात्रेतही तो अनुष्काबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचं दिसलं होतं. अनुष्का आणि विराट हे परफेक्ट कपल आहेत. विराटच्या कठीण काळात अनुष्काने नेहमीच त्याला साथ दिली आहे. विराट आणि अनुष्काने २०१७ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. २०२१ मध्ये अनुष्काने वामिका या त्यांच्या पहिल्या लेकीला जन्म दिला. तर काहीच महिन्यांपूर्वी अनुष्का-विराट अकाय या त्यांच्या दुसऱ्या मुलाचे आईबाबा झाले. 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मासेलिब्रिटीट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024ऑफ द फिल्ड