Join us  

'तुझ्याशिवाय हे अशक्य...'; World Cup जिंकल्यानंतर अनुष्कासाठी विराट कोहलीची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 10:00 AM

प्रत्येक खेळाडून आपल्या आपली पत्नी, मुलं आणि कुटुंबासोबत साजरा केला.

भारताने T20 World Cup जिंकत इतिहास रचला. तब्बल १७ वर्षांनंतर भारताने पुन्हा विश्वचषकावर नाव कोरलं. यामध्ये कोच राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, बुमराह, अक्षर पटेल, हार्दिक पांड्यासह सर्वच खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. यानंतर प्रत्येकाने आपल्या आपली पत्नी आणि मुलांसोबत आनंद साजरा केला. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli)अनुष्का शर्मासाठी (Anushka Sharma) खास पोस्ट शेअर केली आहे. 

विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मावर जीवापाड प्रेम करतो याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे. विराट त्याच्या यशाचं आणि त्याच्या झालेल्या बदलाचं श्रेय कायमच अनुष्काला दिलं आहे. आताही वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याने अनुष्कासाठी खास पोस्ट शेअर केली. दोघांचा सुंदर फोटो शेअर करत तो लिहितो, "हे सगळं तुझ्याशिवाय जराही शक्य झालं नसतं. तू मला नेहमीच नम्र आणि जमिनीवर राहण्यास मदत करते आणि जे आहे ते तू अगदी प्रामाणिकपणे सांगतेस. मी याहून जास्त तुझे आभार मानू शकत नाही. हा विजय जितका माझा तितकाच तुझाही आहे. थँक्यू आणि तू जशी आहेस तशी मला खूप आवडतेस."

विराट आणि अनुष्काच्या आयुष्यात सध्या 'अकाय' च्या  येण्यानेही आनंदाचं वातावरण आहे. मॅचनंतर विराटने अनुष्काला व्हिडिओ कॉल केला तो क्षणही सर्वांनी अनुभवला. विराटच्या या पोस्टवर प्रियंका चोप्रा, विक्रांत मेस्सी यांनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीबॉलिवूडट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024सोशल मीडिया