Join us  

भारतात परतताच Anushka Sharma चा स्वॅग; चाहत्यांकडून प्रेमाचा 'विराट' वर्षाव, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 8:22 PM

अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते.

anushka sharma : अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते. पण, बुधवारी ती मोठ्या कालावधीनंतर भारतात परतली. लंडनमध्ये बराच काळ घालवणारी अनुष्का तिथेच स्थायिक होणार असल्याची चर्चा आहे. अनुष्का मागील अनेक महिन्यांपासून लंडनमध्येच वास्तव्यास आहे. गेल्या काही वर्षांपासून ती सिनेइंडस्ट्रीपासूनही दूर आहे. तिने मुलगा अकायलाही लंडनमध्येच जन्म दिला. आता बऱ्याच महिन्यांनी अनुष्का मुंबई विमानतळावर दिसली. ब्लॅक कॅज्युअल आऊटफिटमध्ये तिने एन्ट्री घेतली अन् चाहत्यांनी तिचे 'विराट' असे स्वागत केले. आता मायदेशात परतताच तिने कार्यक्रमाला हजेरी लावली असता पुन्हा एकदा तिचा स्वॅग कॅमेऱ्यात कैद झाला. (anushka sharma news) 

खरे तर अनुष्का आणि तिचा पती विराट कोहली दोन्ही मुलांसह लंडनमध्येच स्थायिक झाल्याच्या चर्चा आहेत. आता अनुष्का एकटीच  मुंबईत परतली आहे. ब्रँड एंडॉर्समेंट्स आणि वर्क कमिटमेंट्समुळे ती आली आहे. फुल ब्लॅक आऊटफिट, ब्लॅक गॉगल अशा लूकमध्ये दिसली. पापाराझींसमोर तिने पोज दिली आणि नंतर ती कारमध्ये बसून रवाना झाली. सेलिब्रिटी फोटोग्राफर्सने अनुष्काचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली ट्वेंटी-२० विश्वचषक झाल्यापासून लंडनमध्ये आहे. मुंबईत झालेल्या विजयाच्या मिरवणुकीनंतर किंग कोहलीने कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे पसंत केले. अभिनेत्री अनुष्काचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमाच्या रिलीजच्या प्रतिक्षेत आहे. नेटफ्लिक्सवर सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप तारीख निश्चित झालेली नाही.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीबॉलिवूडसेलिब्रिटी