Join us  

‘स्काय इज पिंक’नंतर विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात झळकणार प्रियांका चोप्रा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 11:10 AM

बॉलिवूड इंडस्ट्रीची प्रियांका चोप्राच्या ‘वापसी’ची आतुरतेने प्रतीक्षा करतेय. प्रियांकाचे चाहतेही आपल्या या देसी गर्लला पाहण्यासाठी उत्सूक आहेत. 

बॉलिवूड इंडस्ट्रीची प्रियांका चोप्राच्या ‘वापसी’ची आतुरतेने प्रतीक्षा करतेय. प्रियांकाचे चाहतेही आपल्या या देसी गर्लला पाहण्यासाठी उत्सूक आहेत. अलीकडे प्रियांकाने सलमान खानच्या ‘भारत’ला रामराम ठोकत फरहान अख्तरच्या ‘स्काय इज पिंक’चे शूटींग सुरू केले. ‘स्काय इज पिंक’नंतर प्रियांका विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात दिसणार आहे.खुद्द निर्माता-दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनीच ही माहिती दिली. प्रियांका माझ्या पुढील चित्रपटात काम करण्यास उत्सूक आहे. तिने होकार दिला आहे. आम्हा दोघांची चर्चा सुरु आहे. पुढील वर्षांत या चित्रपटाचे शूटींग सुरू होईल, असे विशाल यांनी सांगितले. तूर्तास या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. पण शेक्सपिअरचे गाजलेले कॉमेडी नॉवेल ‘ट्वेल्फ्थ नाईट’वर हा चित्रपट बेतलेला असेल, असे कळतेय. विशाल भारद्वाज व प्रियांका चोप्रा यांनी याआधी ‘कमीने’ आणि ‘७ खून माफ’ या चित्रपटांत काम केले आहे. प्रियांकाशिवाय विशाल भारद्वाज इरफान खानसोबतही एक चित्रपट करणार आहेत. सध्या इरफानच्या आजारपणामुळे हा चित्रपट थंडबस्त्यात पडला आहे. लवकरच विशाल भारद्वाज निर्मित ‘पटाखा’ रिलीज होतोय.

नुकताच  निक जोनासासोबत प्रियांकाचा रोका झाला.प्रियांकाच्या मुंबईतील घरी प्रियांका व निकचा ‘रोका’ पार पडला. विधिवत पार पडलेल्या या छोटेखानी सोहळ्याला दोघांच्याही कुटुंबातले काही मोजकेच लोक उपस्थित होते.

 

टॅग्स :प्रियंका चोप्राविशाल भारद्वाज