'इश्क विश्क' चित्रपटात माम्बोची भूमिका साकारणारा विशाल मल्होत्रा आठवतोय का? होय, तोच माम्बो ज्याने शाहिद कपूरच्या मित्राची भूमिका साकारली होती. टीव्ही आणि चित्रपटांमध्ये सशक्त भूमिकांमध्ये दिसणाऱ्या विशाल मल्होत्राने आपल्या करिअरमध्ये अनेक मोठ्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. टीव्हीवरील अनेक प्रसिद्ध शोमध्येही तो दिसला आहे. पण अचानक तो इंडस्ट्रीतून गायब झाला. विशाल कुठे गायब आहे? यशाच्या शिखरावर गेल्यानंतर अचानक त्याच्या करिअरला उतरती कळा लागली.
विशाल मल्होत्रा हा टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे. शरारत, हिप हिप हुर्रे आणि क्या मस्त है लाइफ सारख्या अनेक शोमध्ये त्याने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. विशालने इश्क विश्क, जन्नत आणि हॅप्पी न्यू इयर यांसारख्या चित्रपटांमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. स्वत: अभिनेत्याने त्याच्या एका मुलाखतीत त्याच्या कारकिर्दीतील चढ-उतारांबद्दल सांगितले. विशाल म्हणाला होता की, 'इश्क विश्क'मध्ये मम्बो या भूमिकेमुळे तो इतका लोकप्रिय झाला की त्याला चित्रपटांची लाईन लागली. त्याने 12 वर्षे अशाच भूमिका साकारल्या, पण नंतर अचानक असे काही घडले, त्याच्या करिअर संपुष्टात येऊ लागले. शेवटी काय झालं? चला जाणून घेऊया.
बॉलिवूड आणि टीव्हीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर विशाल मल्होत्रा त्याच्या करिअरच्या शिखरावर होता. त्याला भरपूर कामही मिळत होते. यशाच्या शिखरावर असताना विशालने स्वत:ला मोठा स्टार समजायला सुरुवात केली. त्यामुळेच त्याला या गोष्टीचा गर्व वाटू लागला, हे त्यानेच, जोश टॉक हिंदी शोमध्ये स्वत:बद्दल सांगितले होते. विशाल त्याच त्याच भूमिका करत थकला होता. त्यामुळेच त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. यानंतरही विशालला अनेक ऑफर्स येत राहिल्या पण तो त्या नाकारत राहिला आणि काहीतरी वेगळं करण्याची वाट पाहत राहिला. अशातच त्यांची कारकीर्द हळूहळू फ्लॉप होत गेली.
विशालला पुन्हा अभिनयात सक्रिय होण्यासाठी 12 वर्षे वाट पाहावी लागली. आज मी कुठे आहे, तू कुठे आहेस, असे म्हणत अनेक दिग्दर्शकांनी त्यांचा अपमानही केला. यानंतर तो बॅक टू बॅक ऑडिशन देऊ लागला. अखेर त्याला 'तू है मेरा संडे' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याला ओटीटीवरील सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आता विशाल दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता आहे. यासोबतच तो स्वतःची जाहिरात एजन्सी देखील चालवत आहे ज्याची वार्षिक उलाढाल 4 ते 5 कोटी आहे.